आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam Result News In Marathi, CBSC Patarn Students Can See The Result, Divya Marathi

निकालापूर्वीच पाहता येईल सोडवलेली उत्तरपत्रिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आपण सोडवलेल्या उत्तरपत्रिकेतील किती प्रश्‍न बरोबर आहेत आणि किती चूक, तसेच आपल्याला कोणत्या प्रश्‍नासाठी किती गुण मिळाले, याची पडताळणी आता स्वत: विद्यार्थ्यांना करता येणार आहे. यासाठी सीबीएसईने विद्यार्थ्यांना ऑनलाइन उत्तरपत्रिका पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता करिअर निवडताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचीही तयारी करावी लागते. त्यासाठी उत्तम गुण मिळवणे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच आपली गुणवत्ता तपासण्याची सुविधा बोर्डाने संकेतस्थळावर केली आहे. विद्यार्थ्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती बोर्डाच्या संकेतस्थळावर पाहता येतील. यामुळे जेईई, आयआयटी, सीईटी यासारख्या परीक्षेत विद्यार्थ्यांना गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत मिळेल.
दोन विषयांच्या उत्तरपत्रिका पाहता येतील : दहावीच्या वर्गाच्या सर्व उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती विद्यार्थ्यांना पाहता येतील, तर बारावीच्या बॉटनी आणि अर्थशास्त्र या दोनच विषयांच्या उत्तरपत्रिका अपलोड केल्या जाणार आहेत. या यशस्वी प्रयोगानंतर सर्वच उत्तरपत्रिका संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहेत. या सुविधेचा फायदा विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.
उत्तरपत्रिका संकेतस्थळावर पाहता आल्याने परीक्षा पद्धतीत पारदर्शकता निर्माण होईल. तसेच गुणवत्ता पडताळल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढे बारावीत उत्तरे कशी लिहावीत, चुका कशा टाळाव्यात याची काळजी घेता येईल. आशा कोचुरे, शिक्षिका, रेव्हरडेल हायस्कूल
बोर्डाला देता येईल आव्हान
सीबीएसईच्या परीक्षा 17 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू होईल. त्यानंतर काही दिवसांतच या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील. यानंतर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करत योग्य गुण दिलेत की नाही, याविषयी शंका असल्यास बोर्डाला आव्हान देता येईल.
‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना नोंदवता येईल आक्षेप