आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआय वगळता सर्व राष्ट्रीय बँका आज बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सरकारचे धोरण कर्मचारी, कामगारविरोधी असल्याचा आरोप करत डाव्या पक्षांशी संबंधित अनेक संघटनांनी सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. त्यात बहुतांश राज्य सरकारी, महसूल विभागातील शिपाई ते नायब तहसीलदार तसेच एसबीआय वगळता सर्व राष्ट्रीय बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. संपाच्या निमित्ताने क्रांती चौकातून सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

ऑल इंडिया बँक एप्लॉईज असोशिएशन(एआयबीए), इंडियन नॅशनल बँक एप्लॉईज असोसिएशन(एआयबीओए) यासह इतरही संघटना सहभागी होणार असल्याने स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नँशनल बँक, कार्पोरेशन बँक शुक्रवारी बंद राहतील. जिल्ह्यात सुमारे ३०० कोटी रुपयांचे क्लिअरिंग ठप्प होइल, असे बँक ऑफ महाराष्ट्र एमप्लम्पॉईज असोशिएशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. बीएसएनल,एलआयसी, विवीध विभाग तसेच घाटीतील नर्स, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनाचे कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.

महसूलचे कामकाज ठप्प होणार : या संपात सरकारी कर्मचारी संघटना महसूल कर्मचारी (जिल्ह्यातील सुमारे १२ हजार जण) संघटना सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे. तसेच घाटीतील रुग्णसेवेवरही परिणाम होऊ शकतो, असा दावा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव देवीदास जरारे यांनी केला आहे. आयटक, इंटक, अंगणवाडी कर्मचारी संघटना तसेच २० पेक्षा अधिक कंपन्यांमधील संघटनाही आंदोलनात आहेत. या आंदोलनातून सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर आणि खाजगीकरणावर हल्लाबोल करण्यात येणार असल्याचे भाकप नेते भालचंद्र कांगो यांनी सांगितले.

मागण्या अशा
अंशदायीपेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना सुरू करा, प्रस्तावित कामगार कायद्यातील बदल रद्द करा, रिक्त जागा भरा, पाच दिवसांचा आठवडा करा, निवृत्तीचे वय ६० करा.
बातम्या आणखी आहेत...