आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Executive Engineer Gajanan Khade Issue At Aurangabad

लाचखोर कार्यकारी अभियंता खाडेंचा पदभार घेण्यास दुबेंचा नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लाचखोर कार्यकारी अभियंता गजानन खाडे यांनी केलेल्या घोटाळ्यांचा ठपका आपणावर येऊ नये म्हणून त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले व्ही. एल. दुबे यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला.

सुमेध कन्स्ट्रक्शनचे जयप्रकाश शंकरराव नारनवरे यांनी 17 सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता खाडे यांना लाच घेताना पकडून दिले होते. यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या निलंबनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रशासकीय सोयीसाठी व्ही. एल. दुबे यांच्याकडे पदभार देण्याचे लेखी पत्र काढण्यात आले. पत्र निघताच दुबे यांनी आपण पदभार स्वीकारण्यास तयार नसल्याचे प्रशासनाला कळवले. विद्यापीठातील मानसशास्त्र, संस्कृत विभागाच्या इमारतीचे काम कंत्राटदार नारनवरे यांना देण्यात आले. त्यांनी सप्टेंबर 2013 रोजी पूर्ण झालेल्या कामापोटी 76 लाखाचे बिल सादर केले. काम चांगले झालेले असतानाही खाडे यांनी टक्केवारीच्या रकमेसाठी त्रास देणे सुरू केल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.

प्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण
खाडे प्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. खाडे यांना जामीन देण्यास मुख्य सरकारी वकील वाल्मीक शेवाळे यांनी तीव्र विरोध केला. गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत असून बँक लॉकरची माहिती मिळाली नाही. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद अँड. शेवाळे यांनी केला. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. शेट्ये यांच्या न्यायालयात हा युक्तिवाद झाला.