आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायब तलावाच्या शोधार्थ कार्यकारी अभियंत्यांची चौकशी समितीची नियुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लघु पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी गायब केलेल्या तलावाच्या शोधासाठी गुरुवारी कार्यकारी अभियंत्यांची चौकशी समिती नेमण्यात आली. अहवालानंतर दोषींवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता डी. घ. पाझारे यांनी दिली.


घनसावंगी तालुक्यात देवीदहेगाव येथे 2009 मध्ये तलावाचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिलही उचलण्यात आले. जमिनीचा मोबदला घेण्याची नोटीस शेतक-यांना मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शेतक-यांच्या तक्रारीनंतर अधीक्षक अभियंत्यांनी उपविभागीय अभियंत्यांची चौकशी समिती नेमली. अहवाल देऊन दीड महिना लोटला तरी कारवाई करण्यात आली नाही. शेतक-यांनी 5 जूनच्या सुमारास पालकमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती.


याप्रकरणी एक ऑगस्टला ‘दिव्य मराठी’ने हे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर अधीक्षक अभियंत्यांनी कार्यकारी अभियंता यशवंत गच्चे यांना नव्याने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.