आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदूर-मधमेश्वरचा कार्यकारी अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आंबेवाडीयेथील नांदूर-मधमेश्वर कालव्याचे पोटचारीच्या कामाचे लाखांचे चेक दिले उर्वरित लाख ८५ हजारांचे बिल मंजूर करण्यासाठी सात टक्क्यांप्रमाणे ५६ हजार रुपयांची मागणी केली. यापैकी ३८ हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकला. अशोक मारुती शिर्के (५५) असे या अभियंत्याचे नाव आहे. 

तक्रारदाराने दोन वर्षांपूर्वी काम घेतले ते अर्धवट सोडले. निधीअभावी काम बंद होते. बजेट आल्याने काम सुरू झाले. दोन वर्षांतील कामाचे १६ लाख रुपये बिल झाले. त्यापैकी शासकीय कपात जाऊन आठ लाख रुपये बिल झाले होते. बिल घेण्यासाठी तक्रारदारांनी शिर्के यांना भेटून लाख १५ हजारांचा चेक घेतला. त्याबद्दल शिर्के यांनी ५० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

उर्वरित आठ लाखांच्या बदल्यात सात टक्क्याने ५६ हजारांची मागणी केली असता तक्रारदाराने त्यांना १८ हजार रुपये दिले राहिलेली रक्कम मे रोजी वैजापूर येथील कार्यालयात घेऊन येण्याचे सांगितले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तक्रारदाराकडून ३८ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. 

जवाहरनगर भागातील त्रिमूर्ती चौकातील सोनाई निवास येथे हा सापळा रचण्यात आला होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलिस अधीक्षक ज्ञानदेव गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक हेमंत सोमवंशी, निरीक्षक विकास पाटील, अनिता वराडे, वैशाली पवार यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...