आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विपुल साहित्य आणि प्राचीन शस्त्रे पाहून विद्यार्थी भारावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५६ वा वर्धापन दिन २३ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने प्रत्येक विभागाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी "ओपन डे'चा उपक्रम दोन दविस राबवला जात आहे. माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला विद्यापीठाचा "ओपन डे' खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचाच डे असल्याचे गुरुवारी (२१ ऑगस्ट) दिसून आले. अनेक विभागांत विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांची अनुपस्थिती होती, परंतु येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या विभागाची माहिती विद्यार्थी उत्साहाने सर्वांना सांगत होते. विविध विभागांत भरलेल्या प्रदर्शनामुळे विद्यापीठात असलेली विपुल संपदा पाहून प्रत्येक जण भारावल्याचे चित्र दिसून आले.
विद्यापीठाच्या विविध विभागांतील अध्ययन संशोधनाची माहिती सामान्य जनतेला, शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना मिळावी, तसेच नागरिकांशी शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने संवाद साधावा या उद्देशाने "ओपन डे'चा उपक्रम विद्यापीठात दोन दविस राबवला जात आहे. या उपक्रमात मराठी, अर्थशास्त्र, केमिकल टेक्नॉलॉजी, प्रािणशास्त्र, मराठी या विभागांमध्ये विभागाचे वैशिष्ट्य सांगणारे प्रदर्शन भरवण्यात आले. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. अभ्यासक्रमाबराेबरच राज्यात सर्वात चांगल्या असलेल्या प्रात्यक्षिक प्रयोगशाळा आपल्याही विद्यापीठात पाहून विद्यार्थीदेखील भारावले होते.
विद्यापीठातील ऐतिहासिक वास्तूंना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. आपल्या विभागाची माहिती देण्याचा उत्साहदेखील अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. नाट्यशास्त्र विभागात मात्र अनास्था दिसून आली. हा विभाग उपक्रमात सहभागी झाला नसल्याचे दिसून आले. विद्यापीठात असणाऱ्या चांगल्या बाबींची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी यासाठी वर्षातून किमान दोन ते तीन वेळा असे उपक्रम घ्यायला हवेत, अशी अपेक्षा भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
विभागप्रमुख आणि पदाधिकारी बैठकीमध्ये मग्न
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे काही विभागांमध्ये प्रत्यक्ष भेट देताना दिसून आले. मात्र, अधिकारी आणि विभागप्रमुख ओपन होण्याऐवजी बंद खोल्यांच्या बैठकांमध्ये आजही मग्न होते.

आज विद्यापीठात आल्याने बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, हे समजले. चांगला प्रतसिाद मिळण्यासाठी विद्यापीठाने प्रसदि्धीवर जोर द्यायला हवा. "ओपन डे'मध्ये सहभागी होता आले याचा आनंद वाटतो.
कविता चव्हाण, विकानंद महाविद्यालय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात असणाऱ्या चांगल्या गोष्टींची माहिती सगळ्यांना होण्यासाठी वर्षभरात दोन ते तीन वेळा असे प्रदर्शन भरवण्यात यावे. विद्यार्थ्यांचा प्रतसिादही चांगला आहे.
कुमार भवर, हिस्ट्री म्युझियम, डेप्युटी कीपर