आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Explosion In Balaji Paper Mill, Incident In Chikalthana MIDC

बालाजी पेपर मिलमध्ये स्फोट, चिकलठाणा एमआयडीसीतील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: याच बॉयलरचा स्फोट होऊन तरुण जखमी झाला.
औरंगाबाद - चिकलठाणा एमआयडीसीतील बालाजी पेपर मिलमध्ये रविवारी सकाळी सहाच्या सुमारास बॉयलर फुटून मोठा स्फोट झाला. यात रमेश पवार (२७) हा तरुण जखमी झाला असून सिडकोतील खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

गरवारे मैदानाजवळ एकाच शेडमध्ये दोन कंपन्या सुरू आहेत. एका शेडमध्ये इंजिनिअरिंग आणि फॅब्रिकेशनचे काम चालते, तर त्याच्याच मागच्या बाजूस पेपर मिल आहे. या ठिकाणी पुठ्ठा तयार करण्याचे काम चालते. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास रमेश याने पाण्याचे बॉयलर सुरू केले. मात्र, त्याचा व्हॉल्व्ह सुरू करण्यास तो विसरला. बॉयलरमधील रसायन क्षमतेपेक्षा अधिक उकळले आणि त्याचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की छताचे पत्रे सुमारे ५० फूट वर उडाले. बॉयलरमधील उकळते रसायन रमेशच्या चेह-यावर आणि डोक्यावर पडल्यामुळे तो भाजला गेला. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.