Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Explosion In The Tibetan Market Deu To Gas

तिबेटियन मार्केटमधील स्फोट गॅसगळतीमुळेच; आयईडी पथकाच्या अहवालाने कारण स्पष्ट

तिबेटियन मार्केटमध्ये शनिवारी (दि. ७) पहाटे झालेला स्फोट गॅस गळतीमुळेच झाल्याचा अहवाल केंद्राच्या आयइडी पथकाने दिला अाहे

प्रतिनिधी | Oct 09, 2017, 08:49 AM IST

  • तिबेटियन मार्केटमधील स्फोट गॅसगळतीमुळेच; आयईडी पथकाच्या अहवालाने कारण स्पष्ट
नाशिक- तिबेटियन मार्केटमध्ये शनिवारी (दि. ७) पहाटे झालेला स्फोट गॅस गळतीमुळेच झाल्याचा अहवाल केंद्राच्या आयइडी पथकाने दिला अाहे. रविवार दुपारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सरकारवाडा पोलिसांना हा अहवाल देत पुण्याकडे प्रस्थान केले. या अहवालामुळे स्फोटाबाबतच्या अनेक चर्चांना विराम मिळाल्याने पोलिस यंत्रणेनेही सुटकेचा नि:श्वास सोडला.

मार्केटमधील व्यावसायिक गाळ्यांमध्ये झालेल्या माेठ्या स्फोटामुळे पोलिस यंत्रणा चक्रावली होती. पोलिस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक विभागाला या स्फोटाचे गूढ उकलण्यात अडचण निर्माण झाली होती. स्फोटानंतर पोलिस यंत्रणेने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यासाठी केंद्राच्या आयईडी पथकाला पाचारण केले होते. पथकाने घटनास्थळावरील गाेळा केलेल्या पुराव्यांच्या अाधारे हा स्फोट गॅस गळतीमुळे झाल्याचे स्पष्ट केले. सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडे पथकाने अहवाल दिला.

व्यवसाय पूर्ववत; मात्र भीती कायम
स्फाेटासंदर्भाततपासणी पूर्ण झाल्यानंतर रविवारी या परिसरात व्यवयास पूर्ववत सुरू झाले. मात्र, स्फोटाची भीती व्यावसायिकांच्या मनातून गेलेली नाही. स्फोटाची तीव्रता पाहता पोलिसांनी स्फोट झालेले ठिकाण सील करून बंदोबस्त ठेवला हाेता. रविवारी सकाळी नुकसान झालेल्या गाळामालकांनी उद‌्ध्वस्त झालेल्या गाळ्यांमधून साहित्याची जमवाजमव सुरू केली. कपडे व्यावसायिकांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यवसाय पुन्हा सुरू केले.

गाळ्यात पाच दिशांमध्ये साठला गॅस
एकागाळ्यात गॅस गळती झाल्यानंतर तेथील पाच दिशांमध्ये साचून राहिला. गाळ्यात सुरू असलेली वीजबोर्डामध्ये गॅस गेल्याने स्पार्क झाला त्यामुळे स्फोट झाला. एरवी अशा स्वरूपाच्या स्फोटांमुळे मोठी जीवितहानी होते. हा स्फाेट पहाटेच्या वेळी झाल्याने सुदैवाने अनेकांचे प्राण बचावले, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Next Article

Recommended