आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Extended Rail Facilities For Military Issue At Aurangabad, Divya Marathi

सैन्यदलाच्या विस्तारित रेल्वे सुविधेचे लोकार्पण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दौलताबाद येथे 14 वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या भारतीय सैन्यदल विस्तारित रेल्वे सुविधेचे लोकार्पण बुधवारी लेफ्टनंट जनरल पी. आर. शंकर (विशेष सेवा मेडल) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सुविधा निर्मितीच्या कामावर 14 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. येथील रेल्वेस्थानकावर सैन्यदलासाठी दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारल्यामुळे सैन्यदलाच्या साहित्याची थेट वाहतूक होणार आहे.
कार्यक्रमाला ब्रिगेडियर मनोज कुमार (विशेष सेवा मेडल), दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबादचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एस. के. शर्मा, नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रबोधचंदर शर्मा, कर्नल विवेक भाटारा, कर्नल अनुरंजन र्शीवास्तव, कर्नल कुणाल मुखर्जी, ले. कर्नल नितीन सहाय, रेल्वेचे मुख्य अभियंता ए. के. झा, नांदेडचे उपमुख्य अभियंता एस. ए. कय्युम, कार्यकारी अभियंता राजकुमार वानखेडे उपस्थित होते. सैन्यदलासाठी येणारे विविध साहित्य, शस्त्रास्त्रे, वाहने, कॅन्टीनचे सामान मोठय़ा प्रमाणावर आणण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती. सैन्यदलाच्या युनिटची दर तीन वर्षांनंतर देशाच्या इतर भागांत बदली होते. तेव्हा युनिटचे साहित्य वाहने घेऊन जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर कसरत करावी लागायची. भुसावळ अथवा इतर रेल्वे स्थानकांपर्यंत रस्त्याने जाऊन पुढे रेल्वेने जावे लागायचे. योजनेसंबंधीच्या सर्वेक्षणास 1996 मध्ये रेल्वेने सुरुवात केली व 2001 मध्ये योजना स्वीकारली. कामास 2007 मध्ये प्रत्यक्षात प्रारंभ केला. प्रकल्पाचा अंदाजित खर्च पंधरा कोटी असून रेल्वेचा 4 कोटी, तर संरक्षण विभागाचा हिस्सा 10 कोटी 94 लाख रुपये इतका आहे.