आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीच्या प्रवेशासाठी आज दुपारपर्यंत मुदतवाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीसाठी १० हजार ४९२ जागा अलॉटमेंट झाल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात गुरुवारपर्यंत दिलेल्या मुदतीत केवळ अर्धेच म्हणजे ५१३१ प्रवेशच झाले. मग अर्धे विद्यार्थी गेले कुठे तर सेल्फ फायनान्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पसंतीचे विषय देऊन भाग पाडले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळेच कदाचित अर्धेच अॅडमिशन पहिल्या फेरीत झाले आहेत. सायंकाळी येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन शुक्रवारी १४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ दिल्याची माहिती सहायक उपसंचालक भास्कर बाबर यांनी दिली. 

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच यादीत तांत्रिक अडथळे आल्याने गुणवत्ता यादी उशिरा जाहीर झाली. यानंतर प्रवेश घेण्यासाठी तीनच दिवस विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. गुरुवारी प्रवेश घेण्यासाठीची अंतिम मुदत होती. सायंकाळी वाजता ही मुदत संपली, परंतु अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने शुक्रवार १४ जुलैपर्यंत दुपारी १२ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत. 

शाखानिहाय झालेले प्रवेश 
कलाशाखा: ११०४
कॉमर्स: ८३६
सायन्स २९२८
एचएसव्हीसी: २६३

१०,४९२ : पहिल्याफेरीसाठी अलॉटमेंट जागा 
५१३१ : प्रवेशनिश्चिती 
५३६१ : प्रवेशघेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 
बातम्या आणखी आहेत...