आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत आणखी ५० जादा बस सोडण्याचे नियोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या लागत आहेत. पुण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक तर मराठवाडा, विदर्भासाठी सिडकोवरून ५० पेक्षा जास्त जादा बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. सोमवारच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
शनिवार ते मंगळवार असे चार दिवस गर्दी राहणार आहे. त्यानुसार बससेवेचे नियोजन करण्यासाठी सोमवारी विभाग नियंत्रकांच्या दालनात विशेष आढावा बैठक बोलवण्यात आली आहे. सिडको आगारातून विदर्भातील नागपूर, अकोला, मेहकर, रिसोड, वाशीम आणि नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना बस उपलब्ध करून देण्यासाठी ५० जादा बसचे नियोजन केले जाणार सिडकोचे आगार प्रमुख यू. ए. पठाण यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...