आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Extra Capacities Electricity Centers Will Be Set Up In City

शहरात पाच ठिकाणी उभारली जाणार जादा क्षमतेची वीज केंद्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वीज ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेऊन जुन्या उपकेंद्रांमध्ये बदल करण्यात येणार असून काही वाढीव क्षमतेची उपकेंद्रे उभारली जाणार आहेत. त्यासाठी शहरात १४०.९५ कोटींची तर ग्रामीण भागासाठी १५३ कोटी ६६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक ऊर्जा विकास आणि ग्रामीण भागात दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून ही कामे होणार आहेत. विशेष म्हणजे दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना नाममात्र शुल्कात वीज जोडणी दिली जाणार आहे.

चिकलठाणा एमआयडीसीत १३२ केव्हीचे उपकेंद्र, एसटीपीआय येथे १३२ केव्हीचे उपकेंद्र, चिकलठाणा शिवारात २२० केव्हीचे उपकेंद्र, एन १० सिडको ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ १३२ केव्हीचे उपकेंद्र आणि छावणी येथील समाधान कॉलनीत १३२ केव्हीचे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ७६ हजार ६४५ कोटी रुपयांची तरतूद केली असून ५२८६.३६ कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत. यापैकी शहरासाठी १४०.९५ कोटी तर ग्रामीण भागासाठी १५३ कोटी ६६ लाख रुपये अशी एकूण २९४ कोटी ६६ लाखांची तरतदू करण्यात आली आहे.
उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरद्वारे उच्च विद्युत दाब लघु दाबात परावर्तीत करता येतो. उपकेंद्रांमध्ये प्रामुख्याने स्विचिंग, संरक्षण आणि नियंत्रण करणारी उपकरणे असतात. तेथील सर्किट ब्रेकर्स कोणत्याही शॉर्ट सर्किट्सच्या घटनेवेळी तसेच नेटवर्कमध्ये अधिक भार निर्माण झाल्यास वापरात आणले जातात. परिणामी शहर परिसरातील विद्युत वितरण सुरळीत करता येते. शिवाय नागरिकांना आवश्यक दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युत उपकरणे खराब होत नाहीत.

दोन महत्त्वाकांक्षी योजना राबवणार
योजना क्र 1. : एकात्मिकऊर्जा विकास योजनेअंतर्गत पैठण, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर आणि खुलताबाद शहर वीज वितरण प्रणालीच्या विकासासाठी २९ कोटी ८६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खुलताबाद येथे नवीन उपकेंद्र उभारले जाईल. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत २० नवीन उपकेंद्रे उभारून उपकेंद्रांची क्षमता वाढवली जाईल. त्यासाठी अतिरिक्त रोहित्रे ठेवण्यात येतील. ७७ वाहिन्यांचे विलीनीकरण केले जाईल. यामध्ये हजार ३६३ गावांचा समावेश. २० हजार ७०९ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना नाममात्र शुल्कात वीज जोडणी दिली जाईल. १६३२.८ किमी उच्चदाब आणि ४२९.१९ किमी लघुदाब वाहिन्यांची कामे केली जाणार आहेत.
योजना क्र.2 : गंगापूर,सिल्लोड आणि वैजापूर येथे नवीन उपकेंद्रे प्रस्तावित आहेत. उपकेंद्रांची क्षमता वाढवली जाईल. ८अतिरिक्त रोहित्रे, ९९ वाहिन्यांचे विलगीकरण, हजार ३६१ गावांचा समावेश, २१०७.४ किमी उच्च दाब वाहिनी आणि ९६३.४९ किमी लघुदाब वाहिन्यांची कामे होतील. यासाठी १५३ कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण विभागाचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांनी दिली.

या उपकेंद्रांची क्षमता वाढेल
सातारा,बायजीपुरा, जाधववाडी आणि एन- सिडको उपकेंद्रांची क्षमता बाय एमव्हीएवरून बाय १० एमव्हीएवर नेण्यात येणार आहे. त्यासाठी हिमायतबाग आणि सूतगिरणी उपकेंद्रांमध्ये दोन अतिरिक्त रोहित्रे दिली जाणार आहेत. तसेच वीज बळकटीकरणासाठी उच्चदाब लघुदाब वाहिन्यांची कामे केली जातील. वीजचोरी रोखण्यासाठी एअर बंच केबलचा वापर केला जाणार आहे. सौरऊर्जा पॅनलसाठीही खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. विद्युत मीटर अद्ययावत करून त्याअंतर्गत स्टॅटिक मीटर बसवले जाणार आहेत.