आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नेत्रदान करून स्वप्नपूर्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आई-वडिलांना रेल्वे स्टेशनवर सोडून आलेल्या शुभम श्रीकृष्ण बोटुळे याचा दोनच तासांनंतर विद्यापीठ परिसरातील विहिरीत बुडून अंत झाला. ही घटना रविवारी घडली. तरुण पोर गेल्याने बोटुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, हे दु:ख सोसतानाही शुभमच्या घरच्यांनी दुसऱ्याला आनंद देण्याचा निर्णय घेत त्याचे नेत्रदान केले.
शासकीय आयटीआय महाविद्यालयात शिकणाऱ्या शुभमचे आई-वडील रविवारी पहाटे नाशिकला गेले होते. पहाटे साडेपाच वाजता शुभम त्यांना रेल्वेस्टेशनवर सोडून आला होता. नंतर तो दोन मित्रांसोबत तो विद्यापीठ परिसरातील सोनेरी महाल परिसरात फिरण्यासाठी गेला.
सोनेरी महाल परिसरातील शिंगाडी विहिरीत खेळण्यासाठी उतरले, परंतु पोहता येत नसतानाही खेळण्याच्या नादात पाय घसरून तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती पोलिस अग्निशामक दलाला दिल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर शुभमचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेची बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पी. एन. सोनवणे, हेडकॉन्स्टेबल दुबे करीत आहेत.

आई-वडील अर्ध्या रस्त्यातून परतले
नाशिकसाठी निघालेले शुभमचे आई-वडील घटना घडली तेव्हा मनमाडपर्यंत पोहोचले होते. घटना कळताच त्यांनी परतीचा मार्ग धरला. शुभमच्या वडिलांचा इलेक्ट्रिकलचा व्यवसाय आहे. शुभमला एक लहान भाऊ आहे.

नेत्रदानाच्या निर्णयाचा आदर्श
शुभमच्या अपघाताची घटना कळताच शुभमचे आई-वडील शहरात परतले. घरातील मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती नातलगांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...