आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Face The Inquary , If Not Action Will Take ; Education Officer Ordered

योग्य चौकशी करा, नाही तर कारवाईला सामोरे जा ; शिक्षणाधिका-यांचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील 12 शिक्षण संस्थांनी गुरुजींच्या भरती प्रक्रियेत आरक्षण डावलल्याचा ठपका विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी ठेवला. यानंतर 12 शाळांची चौकशी करण्याचे आदेश जि. प. शिक्षण विभागाने दिले होते, मात्र सहायक आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अधिकार्‍यांनी चार महिने उलटूनही कुठलीही चौकशी केली नाही. त्यानंतर डीबी स्टारने वृत्त प्रकाशित केल्यानंतर चौकशी करण्यात आली.


पुनरचौकशीचे आदेश : अहवाल मिळाल्यानंतर विस्तार अधिकार्‍यांनी केलेली चौकशी गोलमाल असल्याचे समोर आले. शिक्षणाधिकारी उपासनी यांनी पुन्हा अहवाल संदिग्ध असल्याने 12 मार्च रोजी पुनरचौकशीचे आदेश दिले. विस्तार अधिकारी अनिल पवार आणि व्ही. पी. दुतोंडे यांनी पुन्हा चौकशी करून 2 एप्रिल रोजी शिक्षण विभागाला अहवाल सादर केला. दुसर्‍यांदा दिलेला अहवालदेखील वस्तुनिष्ठ नसल्याचे समोर आले.


कारवाईचा कडक इशारा : दोनदा केलेल्या चौकशीत चालढकल करणार्‍या चौकशी अधिकार्‍यांना अखेर संतापलेल्या शिक्षणाधिकार्‍यांनी तिसर्‍यांदा चौकशी करण्याचे आदेश देताना कडक कारवाईचा इशारा दिला. 9 मे रोजी त्यांनी तसे पत्रच दिले आहे.


कारवाईचे स्वरूप : सात दिवसांत योग्य व स्पष्ट अहवाल शिक्षण विभागाला सादर न केल्यास नियम 1964 नुसार विस्तार अधिकार्‍यांवर बडतर्फी, निलंबन, वेतनवाढ रोखणे, सक्तीच्या रजेवर पाठवणे इत्यादी स्वरूपाती कारवाई होऊ शकते.


या शाळांची सुरू आहे चौकशी
आरक्षण डावलून भरती प्रक्रिया केलेल्या शाळांमध्ये जि. प.च्या यादीत नालंदा प्राथमिक शाळा, राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय, श्रीकृष्ण प्राथमिक विद्यालय, र्शेयस बालक मंदिर, जागृती प्राथमिक शाळा, ज्योती विद्या मंदिर, मुक्तेश्वर प्राथमिक शाळा, जिजामाता प्राथमिक शाळा, संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळा, बालविकास विद्या मंदिर प्राथमिक शाळा यांचा समावेश आहे.


दुसर्‍याला चौकशी द्यावी
आम्ही दोन वेळेस चौकशी करून शिक्षण विभागाला अहवाल सादर केला आहे. चौकशीत सर्व मुद्दे दिले आहेत. आमची चौकशी योग्य नसेल तर वरिष्ठांनी दुसर्‍या कुणाला चौकशी करण्यास द्यावी. व्ही. पी. दुतोंडे, चौकशी अधिकारी


अहवाल सादर करू
दुसर्‍यांदा चौकशी करून अहवाल सादर केला आहे. पुन्हा चौकशी करण्याचे किंवा कारवाई होणार असे पत्र मिळाले नाही. हवे तर पुन्हा चौकशी करून लवकर वस्तुनिष्ठ अहवाल सादर करू. अनिल पवार, चौकशी अधिकारी


शिक्षणसेवक भरतीत 12 शिक्षण संस्थांनी आरक्षण डावलून घोटाळा केल्याचा अहवाल आला. डीबी स्टारने तो उघडकीस आणला. त्यानंतर एकाच प्रकरणाची दोनदा चौकशी करण्यात आली, पण दोन्ही वेळी चौकशी अधिकार्‍यांनी चालढकल करत चौकशीतही ‘शाळा’ केली. डीबी स्टारने पाठपुरावा केल्यानंतर संतापलेल्या शिक्षणाधिकार्‍यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.


नितीन उपासनी
शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
*दुसरा अहवाल प्राप्त झाला, त्याचे काय झाले?
अहवाल स्वयंस्पष्ट नाही, पुनचरैकशीचे आदेश दिले.
*चौकशीच्या नावावर वेळकाढूपणा सुरू आहे..
नाही, या वेळी केवळ सात दिवसांची मुदत दिली आहे.
*अहवाल गोलमाल देणार्‍यांवर कारवाई का करत नाही?
या वेळी शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल. तसे पत्र दिले आहे. मी कुणाचीही गय करणार नाही.