आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड केला तरी होईल शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपुरुषांची बदनामी करून समाजात दुफळी माजविण्याचा प्रयत्न काही समाजकंटक, विकृत मंडळी सातत्याने करत आहेत. त्यांना रोखण्याचा पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. मात्र, त्यासोबत बदनामीकारक मजकुराचा खात्मा जागेवरच करण्याची जबाबदारी युवक आणि सुज्ञ नागरिकांवर आहे. फेसबुकवर असा विकृत मजकूर फॉरवर्ड करणेही गंभीर गुन्हा आहे. त्यातील आरोपीला 3 वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. समाजहित लक्षात घेऊन तसेच तुरुंगवास टाळण्यासाठी बदनामीकारक मजकूर फॉरवर्ड न करणे शहाणपणाचे आहे.
तीन वर्षांची शिक्षा होईल
सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांच्या बाबतीत अथवा जातीय, धार्मिक भावना भडकावणे, अपमानकारक मजकूर प्रसिद्ध करणे, इतरांसोबत शेअर करणे, पोस्ट करणे हा माहिती तंत्रज्ञान कायदा-2000 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. कलम 66 (अ) नुसार तीन वर्षांपर्यंतची शिक्षा व 5 लाखांपर्यंत आर्थिक दंड होऊ शकतो.’’ गौतम पातारे, पोलिस निरीक्षक तथा आयटी अँक्ट तज्ज्ञ

देशात तणाव निर्माण करणारी माहिती सोशल मीडियात पसरू नये यासाठी आपण उपाय निश्चित करू शकतो. हा प्रकार रिपोर्ट करणे त्यासाठी फक्त 1 मिनिट वेळ पुरेसा असतो. त्यानंतर चार पर्याय येतील त्यातील दुसर्‍या पर्यायावर क्लिक करून कन्टिन्यू क्लिक करा. फेसबुक तक्रार तपासून ते काढून टाकेल.
आपण घ्‍यायची काळजी
  • भावना भडकवणारा फोटो असेल तर तत्काळ स्वत:ला अनटॅग करा. त्यासाठी फोटोला क्लिक करा, ऑप्शनमध्ये जाऊन रिमूव्ह टॅग क्लिक करा
  • आक्षेपार्ह असल्यास आय डोंट लाइक धिस असे क्लिक करा
  • स्टेटसवर जा आणि आय डोंट वाँट सी धिस अगेन क्लिक करा.
  • घृणास्पद माहितीवर संताप व्यक्त करत कॉमेंट करू नका.
  • असा मजकूर लाइक किंवा शेअर करू नका.
  • बदनामीकारक मजकूर टाळण्याची जबाबदारी प्रत्येक सुज्ञ नागरिकावर; समाजहित लक्षात घेऊन सजग राहणे गरजेचे
पुढील स्‍लाइडवर पाहा ग्राफीकल प्रेझेंटेशन