Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Factory Front on district magistrate office

कामगारांचा आक्रोश सुरूच, आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार कारखानदारांचा मोर्चा

प्रतिनिधी | Update - Oct 11, 2017, 10:41 AM IST

कामगार भविष्य निर्वाह निधीच्या विरोधात बुधवारी यंत्रमागधारकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आहे. अक्कलकोट रस्ता एमआ

 • Factory Front on district magistrate office
  सोलापूर- कामगार भविष्य निर्वाह निधीच्या विरोधात बुधवारी यंत्रमागधारकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आहे. अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील यंत्रमागधारक संघाच्या कार्यालयापासून सकाळी दहाला हा माेर्चा निघेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत वस्तुस्थिती कथन करून या कायद्यातून सुटका मिळावी, शासनाने त्यात हस्तक्षेप करावा, अशा मागण्या मांडणार असल्याचे संघाने स्पष्ट केले.

  दरम्यान, मंगळवारीही कामगार संघटनांचा आक्रोश सुरूच होता मनसेप्रणीत कामगार संघटनेने मोर्चा काढला होता. कार्याध्यक्ष श्रीधर गुडेली यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन थडकला. माकप, शिवसेनेच्या संयुक्त कृती समितीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. त्यांच्या बुधवारच्या आंदोलनांना मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही आमचे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा या संघटनांनी दिला आहे. मंगळवारी झालेल्या या आंदोलनात कामगार मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.

  यंत्रमागधारकांच्या मागण्या
  - भविष्य निर्वाहकायदा हा काही फक्त सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगासाठी नाही. तो देशाचा कायदा आहे. सर्वत्र लागू करण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल घ्यावा.
  - नोटाबंदी,जीएसटीमुळेयंत्रमागधारक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. अशा स्थितीत त्यांच्यावर ईपीएफ कायदा लादला जातोय. त्याने कारखानदारांवर मोठा बोजा पडेल. परिणामी उद्योग बंद पडण्याची भीती आहे.
  - याउद्योगातीलकामगार स्थिर नाही. त्याला कुठेही काम करण्याची मुभा आहे. मुळात विकेंद्रित पद्धतीने उत्पादन क्षेत्र असल्याने त्याचे एकत्रीकरण करता येणार नाही.
  - प्रत्येकउत्पादनविभागाला स्वतंत्र परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, स्वतंत्र वीज जोडणी, एसएसआय प्रमाणपत्र, शॉप अॅक्ट, फॅक्टरी अॅक्ट आहे. त्यांची नोंदणी केलेली आहे.
  - शातभिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, मदुराई, इरोड, सेलम, सिरसिल्ला आदी ठिकाणी हा उद्योग अाहे. परंतु कुठेच ईपीएफ कायदा लागू नाही. तो सोलापूरलाच का?

  बंद काळातीलवेतन आणि दिवाळी बोनसविषयी कारखानदारांची बैठक लावतो. भविष्य निधीचा विषय माझ्या अखत्यारीतला नाही. तो केंद्रस्तरावरील आहे. कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही.
  - बी.आर. देशमुख, सहायक

  कामगार आयुक्त
  कामगारांचा लढा सनदशीर मार्गाने असताना, त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. जिल्हा प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी कामगारांचे आंदोलन थांबणार नाही.
  - नरसय्या आडम, ज्येष्ठ कामगार नेते

Trending