आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचा प्रयत्न फसला म्हणून गाडी जाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयभवानी नगरात चोरट्याने गाडी पळवता आली नाही म्हणून रागाच्या भरात तिला पेटवून दिले. छाया : दिव्य मराठी - Divya Marathi
जयभवानी नगरात चोरट्याने गाडी पळवता आली नाही म्हणून रागाच्या भरात तिला पेटवून दिले. छाया : दिव्य मराठी
औरंगाबाद- जयभवानीनगरातीलगणेशनगर भागात शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास पुन्हा एकदा चारचाकी टाटा जीप जाळण्याचा प्रकार घडला. ही गाडी ज्या ठिकाणी लावली होती तेथून समोर आणून चोरट्यांनी जाळली. गाडी चोरण्याचा प्रयत्न झाला, मात्र ती नेता आली नसल्याने चोरीचा प्रयत्न फसला म्हणून गाडी जाळली ती जाळली असावी, अशी माहिती गाडीचे मालक शिवनाथ किसन पातकळ यांनी दिली. मुकंदवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

बांधकाम आणि प्लास्टरचे काम करणारे शिवनाथ किसन पातकळ जयभवानीनगरात गल्ली नंबर चारमध्ये राहतात. त्यांच्याकडे काही बिगारी लोक कामाला असल्याने त्यांची रोज ने-आण करण्यासाठी ते टाटा जीप (एमएच २३- ४२८०) वापरतात. शुक्रवारी रात्री काम आटोपल्यानंतर घरापासून थोड्या अंतरावर रोजच्या ठिकाणी पातकळ यांनी जीप लावली आणि घरी निघून गेले. दरम्यान, रात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी येऊन गाडी जागेवरून काही फूट पुढे नेली आणि नंतर तिला आग लावली. आगीच्या लोळामुळे बाजूच्या लोकांना जाग आली. त्यांनी तत्काळ पाण्याची मोटार लावून अाग विझविण्यास सुरुवात केली अाणि ही माहिती पातकळ यांना फोनवरून सांगितली. पातकळ तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनीदेखील घटनास्थळी येऊन पाहणी केली. पातकळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सराईत टोळी तुरुंगात, तरी प्रकार थांबेनात
काहीदिवसांपूर्वी शहरात वाहने जाळण्याचे प्रकार घडले होते. गाडी जाळल्याप्रकरणी जॉन तीर्थे अाणि सचिन कळसकर यांच्या गँगला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली होती. या गँगला मोक्कादेखील लावण्यात आला. चरस आणि गांजाच्या नशेत ही टोळी हे कृत्य करायची. त्यांना अटक केल्यानंतर गाड्या जाळण्याचे प्रकार काही दिवस थांबले होते. मात्र, या घटनेनंतर आता ही कोणती नवीन टोळी आली आहे, हा प्रश्न पोलिस आणि नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.