आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्यांचा लिलाव पाडला बंद, लासूर स्टेशन बाजारपेठेत सुमारे पंधरा हजार गोण्यांची झाली आवक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला शंभराच्या आत भाव मिळत असल्याच्या कारणावरून रविवारी अखेर शेतकऱ्यांनी कांद्यांचा लिलाव बंद पाडत तीन तास गोंधळ सुरू राहिल्याने शेतकरी संतप्त झाले होते.

रविवारी येथील बाजार समितीमधील मोंढ्यात कांदा खरेदीचा वार असल्याने नेहमी प्रमाणे शेतकऱ्यांनी आपला कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला होता परंतु व्यापाऱ्यांचा लिलाव सुरू होताच अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी अखेर हा लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या कार्यालयाकडे धाव घेतली असता
दरम्यान माजी सभापती कृष्णा पाटील डोणगावकर यांनी शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता व्यापाऱ्यांना बोलवत कांदा योग्य भावाने खरेदी करण्याच्या सूचना देत तेही निघून गेले त्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू न करता गणेश विसर्जन करण्याच्या सुटीसाठी बुधवारी कांदा मार्केट बंद ठेवण्याचा अर्ज देण्यासाठी बराच वेळ घातला. त्यामुळे शेतकरी आणखीनच बिघडत, त्यात चक्क एकाने मला खूप भूक लागली माझ्याकडे फक्त दहा रुपये असल्याने मला नाष्टा देखील करता येईना असे सांगताच शेतकरी बिघडले नंतर कोठे व्यापारी लिलावासाठी निघाले अन् तीन तासांनी लिलाव पूर्वरत झाला. या वेळी अनेक शेतकऱ्यांनी हाच कांदा दुसऱ्या मार्केटमध्ये सातशे रुपयांनी विकला गेला असा दावा करत येथे हाच कांदा तीनशे रुपयांनी व्यापारी खरेदी करीत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला तर व्यापारी सांगतात आम्ही इतर बाजारपेठेच्या तुलनेत कांदा खरेदी करतो परंतु कांदा खराब असल्याने भाव मिळत नाही. दरम्यान शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मुंढे, आशोक गंगावणे आदींनी बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन माहिती घेत आडत व्यापाऱ्यांकडे पेट्रोलिंग केली.
आज कांदा बाजारपेठेत सुमारे पंधरा हजार गोण्याची आवक झाली असून सरासरी शंभर रुपयांपासून चांगल्या कांद्याला पाचशे ते सातशे रुपये भाव मिळाला.
बातम्या आणखी आहेत...