आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया सीआयडीने वृद्ध दांपत्यास लुबाडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खून झाल्याने पुढे न जाता सर्व दागिने काढून ठेवा, अशी बतावणी करून तोतया सीआयडीने वृद्ध दांपत्याचे चार तोळे सोने लंपास केल्याची घटना रविवारी (17 मार्च) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली; परंतु आणखी एका वृद्ध महिलेला अशाच प्रकारे फसवण्याचा या भामट्यांचा प्रयत्न फसला.

शांतिनिकेतन कॉलनीतील निवृत्त अभियंत्ता श्रीराम वरूडकर (79) व त्यांची पत्नी लीला (75) हे दोघे भाजीपाला आणण्यासाठी औरंगपुरा येथे गेले होते. सर्मथनगरातील विवेकांनद बुक डेपोजवळ दोन तोतयांनी त्यांना गाठले व या रस्त्यावर पुढे खून झाला असून तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा, अशी बतावणी केली. घाबरलेल्या लीला यांनी मंगळसूत्र व श्रीराम यांनी गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन काढून घेतली. त्यानंतर दागिने रुमालात गुंडाळण्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. रुमालात दागिने काढताना हातचलाखी करून ते दागिने लंपास केले. क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

वृद्धेची समयसूचकता : ज्योतीनगरमध्ये नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शनासाठी जाताना प्रभावती वैद्य (75) यांना सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान याच दोन तोतया सीआयडींनी गाठत ‘आजीबाई, तुम्हाला शर्मा साहेबांनी भेटण्यासाठी बोलावले आहे,’ अशी बतावणी केली. पुढे खून झाला आहे. त्यामुळे अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा, असे त्यांनी सांगितले. वैद्य यांना शंका आल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली. पकडले जाण्याच्या भीतीने दोघे भामटे पसार झाले.