आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया सीआयडीने तीन वृद्धांना लुबाडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तोतया सीआयडींनी शहरातील ठिकठिकाणी तीन वृद्धांना ठकवले असून त्यांच्याकडील पाऊण लाखाचा ऐवज लांबवला. या घटना मंगळवारी सकाळी एकापाठोपाठ एक घडल्या. मुकुंदवाडी आणि सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.


भामट्यांचे वर्णन
तिन्ही घटना एकाच टोळीने केल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक उंच व्यक्ती आणि त्याने पांढरा शर्ट घातलेला होता. दुसरा सावळ्या रंगाचा असून बुटका आहे. यांच्याकडे काळ्या रंगाची दुचाकी आहे.


काही मिनिटांतच भामट्यांनी पळवला पाऊण लाखाचा ऐवज
पैठण तालुक्यात गेवराई येथील शेतकरी सोनाजी खोतकर नातेवाइकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. सकाळी 11 वाजता ते मुकुंदवाडी येथील रामनगरकडे जाताना बसस्टॉपजवळ उभे होते. एवढय़ात दोन जण आले. तुमच्या पिशवीत गांजा आहे. आम्ही सीआयडीचे इन्स्पेक्टर आहोत. तुमची झडती घ्यायची आहे, असे म्हणत पिशवी तपासली. वृद्धाची अंगठी आणि गळ्यातली सोनसाखळी काढून ठेवण्याचे सांगितले आणि हातचलाखी करून दागिने पळवले. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


जाधववाडी मोंढा भागातील सनी सेंटर येथे सकाळी बारा वाजता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी उत्तम आर्शुबा पळसकर (60, रा. पळशी ) यांना अडवले आणि तुमच्याजवळ गांजा आहे. तुमची झडती घ्यायची आहे, असे म्हणत त्यांच्या खिशातील रोख साडेनऊ हजार रुपये पळवले. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टीव्ही सेंटर भागातही एका वृद्धाला फसवण्यात आले. वृद्धाने नजीकच्या पोलिस चौकीतील पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला, पण लेखी तक्रार देण्यास वृद्धाने नकार दिला.