आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर झाली मैत्री, लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय युवतीला पळवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - फेसबुकवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय युवतीला पळवणार्‍या युवकाच्या तावडीतून तीन दिवसांत सुटका करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी (22 जून) पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. या युवतीचे 9 जून रोजी पहाटे अपहरण करण्यात आले होते.

पैठण रोडवरील रिव्हरडेल इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान शाखेत बारावीचे शिक्षण घेणार्‍या औरंगपुरा भागातील 17 वर्षीय बीड येथील बबलू खान शहनशहा खान याने अपहरण केले. फेसबुकवर चॅटिंग करताना आर्यन सिंह या नावाने बनावट खाते उघडून त्याने या युवतीशी ओळख वाढवली आणि लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले.

याप्रकरणी 10 जून रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आणि नातेवाइकांनी शोध घेतला असता अपहरणकर्ता हा बीडचा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी चौकशीसाठी त्याच्या भावाला ताब्यात घेतले होते; परंतु त्याने तोंड न उघडल्याने युवतीचा शोध लागू शकला नाही.

शनिवारी सामाजिक समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. युवतींना फूस लावून पळवणारे रॅकेट जोर धरत असून, ते उधळून लावावे नसता जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.