आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीच्या नावाने फेसबुकचे फेक अकाऊंट, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून असभ्य चॅटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती/नांदगाव पेठ- सोशल मीडियामुळे जग जवळ आले तरी त्याचा जपून वापर करावा असा सल्ला प्रत्येक वेळी दिला जातो. मात्र काही समाजकंटक मात्र याच सोशल मीडियाचा गैरवापर करून कुणाची बदनामी करायलाही मागेपुढे पहात नाही. असाच काहीसा प्रकार नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. 

येथील एका शाळेत सहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीच्या नावाने बनावट फेसबुकचे अकाऊंट उघडून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून असभ्य चॅटिंग करीत बदनामी करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध विद्यार्थिनीच्या आईने नांदगाव पेठ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अज्ञाताने केलेल्या या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अज्ञाताने इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या नावाने फेक अकाउंट तयार केले. त्याआधारे गावातीलच काही जणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत अश्लिल भाषेत संवाद साधायला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार असाच सुरू होता. दरम्यान अज्ञाताने विद्यार्थिनीच्या नातेवाईकाशीदेखील अशाच प्रकारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून चॅटिंग केली. त्यातून हा प्रकार समोर आला. 

विद्यार्थिनीच्या नातेवाईकाने थेट तिचे घर गाठून तिच्या परिवाराला याबाबत माहिती दिली. ही बाब कळताच परिवाराच्या विद्यार्थिनीच्या पायाखालची वाळू सरकली. विशेष म्हणजे या विद्यार्थिनीकडे कोणताच मोबाईल किंवा संगणक नसल्याने ती या प्रकाराची काहीच माहिती नव्हती. या घटनेने संतप्त झालेल्या विद्यार्थिनीच्या आईने नांदगाव पोलिस स्टेशन गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल व्हायचा असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील हे सायबर सेलच्या माध्यमातून अज्ञाताचा शोध घेण्याच्या दिशेने तपास करीत आहेत. 

२४ तासांत आरोपींना ताब्यात घेणार 
संबंधित फेसबुक अकांऊट त्याच्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक सायबर सेलकडे तपासणीसाठी पाठवला आहे. त्याच्या आधारे येत्या २४ तासात मुख्य आरोपींना जेरबंद करू. उमेशपाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक 
बातम्या आणखी आहेत...