आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाचे शिक्कामोर्तब: नरेंद्र जबिंदा यांच्याविरुद्ध अँट्रॉसिटीची तक्रार खोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सातारा परिसरातील सर्व्हे क्रमांक 23 मधील जमीन बळकावण्यासाठी नरेंद्रसिंग तारासिंग जबिंदा यांनी 4 व 5 मार्च 2013 रोजी गुंडांच्या मदतीने छळ केल्याची तक्रार तपासाअंती खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने या संदर्भात पोलिसांनी दाखल केलेल्या तपास अहवालावर शिक्कामोर्तब केले आहे. कांता बाबूराव कांबळे यांनी ही तक्रार न्यायालयात दाखल केली होती.

ज्ञानेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था ही सातारा परिसरातील सर्वे क्रमांक 23 मध्ये आहे. या जमिनीवरून न्यायालयात वाद सुरू आहे. कांबळे यांनी वकिलामार्फत जबिंदा यांच्यासह त्यांच्या 10 ते 15 साथीदारांविरुद्ध न्यायालयात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून न्यायालयाने जबिंदा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍याने घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. त्यात कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत जे आरोप केले होते ते खोटे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात ‘ब’ फायनल न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी अशोक सोनी यांच्यासमोर झाली. त्यांनी पोलिसांच्या तपास अहवालावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे कांबळे यांनी जबिंदा यांच्यावर लावलेले आरोप निराधार ठरले आहेत.

सर्व्हे क्रमांक 23 मध्ये सिलिंगची 4 एकर 13 गुंठे जमीन आहे. त्यावर सध्या कांबळे यांचा ताबा आहे. जबिंदा किंवा त्यांचे साथीदार त्या वसाहतीत गेले नसल्याचे सबळ पुरावे तपासात पुढे आले आहेत. कांबळे यांच्याविरुद्ध तीन पोलिस ठाण्यांमध्ये इतर दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.

सर्व्हे क्र. 23 मधील संबंधित जमिनीचे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले असून, त्या न्यायालयाने 2013 पर्यंत प्रकरणाला ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कांता कांबळे यांनी त्यांच्या मागासवर्गीय जातीचा फायदा घेऊन खोटी तक्रार केली, असे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.