आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट मसाला बनवणाऱ्यास गुन्हे शाखा पोलिसांनी ‘कुटले’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नामांकित प्रवीण अंबारी मसाल्याच्या नावे विविध प्रकारचे बनावट मसाले तयार करून त्यांची जिल्ह्यासह जालन्यात विक्री करणाऱ्या शहरातील सुनील एकनाथ कोरडे (४०, रा. एन-९, शिवाजीनगर) याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून लाख ६६ हजार ७८० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
औरंगाबादसह जालना जिल्ह्यात प्रवीण अंबारी मसाल्याचे बनावट उत्पादन सुरू असून त्याची कमी किमतीत दुकानदारांना विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे विक्री व्यवस्थापक राहुल नागपाल यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बनावट मसाल्याच्या ठोक विक्रेत्याचा शोध घेतला. तेव्हा सुनील कोरडे याने त्याचा मित्र अनिल जाधव याच्या दोन खोल्या महिनाभरापूर्वी भाड्याने घेऊन तेथून तो बनावट मसाला विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्याशी संपर्क साधला. शनिवारी सायंकाळी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रशांत आवारे, जमादार देविदास राठोड, सुनील पाटील, एस. सी. राठोड, शिवा बोर्डे, महिला शिपाई सरिता भोपळे यांनी सुनील कोरडेच्या हिमायतबाग परिसरातील गीता कॉलनीत सुरू असलेल्या कारखान्यावर छापा मारला. या वेळी पोलिसांनी पॅकिंग मशीनसह ३० ५० ग्रॅमच्या पुड्यांमध्ये तसेच काही प्रमाणात सुट्या कॅरीबॅगमध्ये असलेला एक टन मसाला जप्त केला. कोरडेविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.
बातम्या आणखी आहेत...