आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट दागिन्याची विक्री करणा-या राजस्‍थानचा भामट अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अमेरिकन हिरेजडित सोन्याचे कमी कॅरेटचे दागिने अस्सल असल्याचे भासवून फसवणार्‍या राजस्थानच्या भामट्यास पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून सुमारे 40 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले.

भरतपूर येथील लव अशोक गर्ग (25) हा युवक शुक्रवारी सायंकाळी कमी कॅरेटचे हिरेजडित सोन्याचे दागिने घेऊन शहरात विक्रीसाठी रेल्वेने येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक हरीश खटावकर, जमादार गोकुळ वाघ, संदेश कीर्तिकर, दादासाहेब झारगड, विवेक कदम, प्रेमा सुपारे आणि मंजुळा नागरे यांनी स्टेशनवर त्याला पकडले.

अंगठय़ा, नेकलेस.. बरेच काही

51 टॉप, 23 अंगठय़ा, 12 नेकलेस, 2 ब्रेसलेट, 2 गोफ, 8 मोरण्या, 2 मणी मंगळसूत्र, 6 चेन, 39 पदके असे दागिने पोलिसांनी जप्त केले.


शहरातील महिला मध्यस्थ
शहरात या भामट्याची ही तिसरी चक्कर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दागिने तो राजस्थानातून कमी किमतीत आणून विक्री करत होता. कविता महेंद्र बन्सल (45, रा. प्लॉट नं. 7, रामविला अपार्टमेंट, गारखेडा परिसर) या महिलेच्या माध्यमातून दागिन्यांची व्यापारी आणि नागरिकांना विक्री केली जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.


असा होता फंडा
कमी कॅरेटचे दागिने 22 ते 24 कॅरेटचे असल्याचे सांगून शहरातील व्यापारी व नागरिकांना विक्री करायची. पैशासाठी सवलतही द्यायची.
भिशी व बचत गट चालवणार्‍या महिलांच्या संपर्कात त्यांना हे दागिने विकायचे.