आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटांप्रकरणी दोन आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बनावटनोटा प्रकरणात आरोपी व्यंकटेश कृष्णराव देशपांडेला (२७, धावणी मोहल्ला) दहा, तर शेख करीम शेखला (३५, रांजणगाव) वर्षांची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. शेट्ये यांनी सुनावली. गुन्हेशाखेचे जमादार नसीम खान शब्बीर खान गुन्हे शाखा यांनी सप्टेंबर २००६ रोजी फिर्याद दिली होती.
देशपांडेकडे शहागंज येथील गांधी पुतळ्याजवळ पाचशे रुपयांच्या दहा नोटा सापडल्या होत्या. त्या चलनात आणण्यासाठी त्याने शेख करीमची मदत घेतली होती. व्यंकटेशने बाबरा गाव येथील सुभाष गोसावी याला लाख हजार रुपयांच्या बनावट नोटा दिल्या होत्या. तसेच त्याच्या घरीदेखील ५६५० रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या.
सहा साक्षीदार तपासले
याप्रकरणात सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये तपास अधिकारी पीएसआय नीलेश बागूल आणि पंच विक्रम भुजंग यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपी व्यंकटेशला कलम ४८९ बी अन्वये १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार दंड ठोठावण्यात आला आहे, तर ४८९ अन्वये वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार दंड ठोठावला आहे. आरोपी शेख करीमला वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. छाया पडोळ झुंजुर्डे यांनी काम पाहिले.