आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भामट्याने आपल्याच वडिलांना बनवले चक्क महसूलमंत्र्यांचे पीए

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आपले वडील राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे पीए आहेत. त्यामुळे आयकर विभागात दोन लाख रुपयांत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून किशोर जगताप या भामट्याने तिघांना फसवल्याचे पोलिसांनी सांगितले. जगतापला न्यायालयाने 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

औरंगपुर्‍यात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणार्‍या अनिल रंगनाथ सांगळेशी जगतापची ओळख झाली होती. त्याने सांगळेला आयकर विभागात शिपाई पदावर नोकरी लावून देण्यासाठी 2 लाख रुपये मागितले होते. त्यानुसार सांगळेने 13 जानेवारी 2012 जगतापला 2 लाख रुपये दिले. या वेळी त्याने आणखी दोन जागा रिक्त असून, त्यांचे काम करून देतो असे सांगळेला सांगितले. तेव्हा सांगळेने त्याचे दोन मित्र शिवानंद बद्रीनाथ मुंढे आणि समाधान दिनकर मान्टे (दोघेही रा. बुलडाणा) यांची जगतापशी भेट घालून दिली. या भेटीनंतर जगताप विना क्रमांकाच्या आलिशान कारने बुलडाण्याला गेला. तेथे त्याने आपले वडील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे पीए असून, लग्नासाठी मुलगी बघण्याचे काम सुरू असल्याची थाप तेथील नागरिकांना मारली होती. तसेच नंदनवन कॉलनीत मोठा बंगला असून, स्वत:ची एक कंपनी असल्याचेही त्याने सांगितले होते. यानंतर त्याने मुंढे आणि मान्टेला आपल्या जाळय़ात ओढत त्यांच्याकडून 20 फेब्रुवारी 2012 रोजी बाबा पेट्रोल पंपाजवळ चार लाख रुपये घेतले होते. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून याचा पुढील तपास उपनिरीक्षक ए. व्ही. सातोदकर करीत आहेत.