आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया पोलिसांनी पळवले आठ तोळ्यांचे दागिने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तोतया पोलिसांनी बुधवारी सकाळी वृद्धेचे आठ तोळ्यांचे दागिने पळवले. ही घटना गारखेड्यातील लक्ष्मीनगरात घडली. हद्दीच्या वादामुळे उशीरा जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

मालती प्रभाकर ढवळे (67, रा. सुखद सहवास, लक्ष्मीनगर) या घरापासून काही अंतरावर फुले तोडण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, दोन भामटे दुचाकीवर त्यांच्या जवळ आले. त्यांनी एवढे दागिने अंगावर का घालून फिरता असे म्हणत वृद्धेच्या हातातील पाच तोळ्यांच्या चार बांगड्या आणि तीन तोळ्याचे गंठण पळवले. गारखेडा परिसरात वाढत असलेल्या घरफोड्या, मंगळसूत्र चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे भामट्यांचा माग काढण्याच्या हेतूने बीट मार्शलांना नियंत्रण कक्षाकडून सूचना दिल्या जात होत्या.

मात्र, या परिसरात गस्त घालणार्‍या 20 पोलिस वाहनांची जीपीआरएस सिस्टिमच कर्मचार्‍यांनी बंद करून ठेवली होती अशी धक्कादायक माहिती गुरुवारी पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.