आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठ सिनेट निवडणुकीत उमेदवाराकडून खोट्या सह्या, स्टॅम्प, लेटरहेडचा वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर/औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट निवडणुकीत दोन प्राध्यापकांनी संगनमत करून प्राचार्याची बनावट स्वाक्षरी, रबर स्टँम्प, लेटर हेडचा वापर करून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शेख शरिफोद्दीनसह महेश उंडेगावकर यांच्याविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असून गुरुवारी पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ निवडणूक २४ नोव्हेंबर रोजी होत असून, निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २५ ते ३० ऑक्टोबर ही मुदत होती. दरम्यान बदनापूर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. शेख शरीफोद्दीन फकिरोददीन (शफी) यांनी सिनेट निवडणुकीत शिक्षक मतदारसंघ खुला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे सत्यापन प्रमाणपत्र व शिक्षकांनी परीक्षा संदर्भात केलेल्या कामाचे तसेच दहा वर्षे सेवा पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. सदर प्रमाणपत्र व उमदेवारी अर्जावर प्राचार्यांच्या स्वाक्षऱ्या असतात. परंतु शेख शफी यांनी बदनापूर येथील महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कोणत्याही स्वाक्षऱ्या न घेता महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख महेश उंडेनगावकर यांच्याशी संगनमत करून महाविद्यालयाचे रबर स्टँम्प, लेटर पॅड बनावट बनवून प्राचार्यांच्या स्वाक्षऱ्या स्वत:च मारुन उमेदवारी अर्ज दाखल केला

बातम्या आणखी आहेत...