आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट टीसी देणारा अटकेत, पासपोर्ट तयार करण्याचा प्रयत्न फसला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हजला जायचे असल्याने पासपोर्ट काढण्यासाठी पोलिसांना बनावट टीसी सादर केल्याचे उघडकीस आल्यानंतर भावसिंगपुरा येथील शेख इस्माईल शेख इब्राहिम (45, रा. भीमनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला बनावट टीसी तयार करून देणार्‍या भामट्याचाही पोलिस शोध घेत आहेत.

शेख इस्माईल हा मूळचा नांदेड जिल्हय़ातील शहापूर येथील रहिवासी आहे. त्याचे मूळ नाव गंगाधर सायन्ना ओसवार असे असून, त्याने 14 ते 15 वर्षांपूर्वी मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यानंतर रेल्वेस्टेशन येथील एका महिलेशी त्याने विवाह केला. हज यात्रेला जायचे असल्याने पासपोर्टसाठी त्याने छावणी पोलिसांकडे कागदपत्रे जमा केली. त्यासोबतच त्याने दिलेल्या शाळेच्या टीसीबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्याने संजयनगर, मुकुंदवाडी येथील विनय प्राथमिक शाळेत 1980 मध्ये प्रवेश घेतल्याचे सांगितले होते. यानंतर पोलिसांनी शाळेची माहिती घेतली असता ती स्थापनच 1986 मध्ये झाल्याचे उघड झाले. त्यामुळे त्याने दिलेली टीसी बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर छावणी पोलिस ठाण्याचे जमादार संजय बहिरव, भास्कर ढगे, दिलीप अकोलकर, आबा फलके यांनी शेख इस्माईल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला शनिवारी अटक केली.