आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोच्या बोटाचा घेतला चावा, हायकोर्टाच्या ध्यानसाधना कक्षेतील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सामान्यत:मन शांत व्हावे, मनातले विकार दूर व्हावे तसेच सद्सद्विवेक जागृत राहण्यासाठी चिंतन, ध्यान (मेडिटेशन) करण्यात येते. परंतु ध्यानसाधना शिबिरात कौटुंबिक वादामुळे न्यायालयात तारखेसाठी आलेल्या जोडप्याचे कडाक्याचे भांडण झाले आणि नवऱ्याने शिव्यांची लाखोली वाहत बायकोच्या डाव्या हाताच्या बोटाला कडकडून चावा घेतल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर येथील या महिलेचा मुंबईच्या व्यक्तीशी २००३ मध्ये विवाह झाला होता. काही वर्षांनंतर त्यांच्यात खटके उडाले. परिणामी खंडपीठात प्रकरण दाखल झाले. न्यायालयामध्ये कौटुंबिक वादातील व्यक्तींची ध्यानसाधना, करण्यात येते. या जोडप्यालाही गुरुवारी न्यायालयाच्या ध्यानसाधना सभागृहामध्ये दाखल केले होते.

या वेळी दोघांचे वकील बाहेर उभे होते. आतमध्ये दोघात शाब्दिक चकमक झाली. नवऱ्याने पातळी ओलांडून पत्नीला जिवे मारण्याची धमकी देत बोटाला चावा घेताच ती किंचाळली.वकील आत गेले आणि त्यांचे भांडण सोडवले.