आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक शाखेची ५०० दुचाकींवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या आणि अनधिकृत पार्किंगमध्ये लावलेल्या अशा वाहनांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई करण्यात आली. मंगळवारी ५०० दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई केली. डीबीस्टारने शहरातील फॅन्सी नंबर प्लेटकडे पोलिसांचे लक्ष वेधले होते. या शिवाय याबाबत वॉटसअॅपवर मोहीमही राबवली होती. त्यास जागरूक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली.
अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांस प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने सोमवारपासून फॅन्सी नंबर प्लेट तसेच विनाक्रमांकाच्या वाहनांवर संपूर्ण शहरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत सातशे दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. एकूण ९३५ वाहनधारकांकडून तब्बल दीड लाख रुपये दंडही वसुल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी दिली. पोलिस आयुक्तालयामार्फत वाहतूक शाखेअंतर्गत ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. शहरातील अनेक गाड्या या विनाक्रमांकाच्या असल्यामुळे चोरीच्या अनेक घटना घडण्याची शक्यता असते. शिवाय अनेक वाहनांवर फॅन्सी नंबर टाकण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ही कारवाई सुरू करण्यात आली. पोलिस उपायुक्त संदीप आटोळे आणि बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम सुरू आहे.