आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंडा न घेताच लग्न करणाऱ्या दांपत्याचा बजाजनगरात सत्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुंडा घेता लग्न करत समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या प्रा. संतोष विरकर स्वाती विरकर या दांपत्याचा सत्कार करताना संग्राम कोते पाटील, अभिषेक देशमुख, विजय साळवे आदी. - Divya Marathi
हुंडा घेता लग्न करत समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या प्रा. संतोष विरकर स्वाती विरकर या दांपत्याचा सत्कार करताना संग्राम कोते पाटील, अभिषेक देशमुख, विजय साळवे आदी.
वाळूज- हुंडा प्रथेविरोधात समाजात तसेच तरुणाईमध्ये जनजागृती प्रबोधन करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हुंडा घेता लग्न करणाऱ्या दांपत्याचा तसेच नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील मसिआ सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अभिषेक देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, प्रदेश संघटक विजय साळवे, प्रकाश सोळंके, बीड जिल्हाध्यक्ष शफिक शेख, वाळूज महानगर अध्यक्ष उमेश दुधाट, सुनील गव्हाणे, अमोल ताठे, अदिक इंदलकर, नूतन अडसरे, धनश्री कांबळे, करण साळे, फिरोज पठाण आदींची उपस्थिती होती. 
 
या कार्यक्रमाची सुरुवात येथील मोहटादेवी मंदिरात संग्राम कोते यांच्या हस्ते महाआरतीने करण्यात आली. त्यानंतर दुचाकीसह मोठ्या संख्येत एकत्र आलेल्या युवकांनी बजाजनगर परिसरातून भव्य दुचाकी रॅली काढत रॅलीचा समारोप मोरे चौकात करण्यात आला. 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शहराध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी पक्षांतर्गत सच्च्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे डावलून पुढे-पुढे करणाऱ्यांना मानसन्मान दिला जातो, हे सांगताना घोडा बकऱ्याची गोष्ट सांगितली. गोष्टीचा शेवट प्रामाणिक बकऱ्याची कत्तल घोड्याची वाहवा... असा होता. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, बीड जिल्हाध्यक्ष शफिक शेख आदींनीसुद्धा उपस्थित तरुणांना मार्गदर्शन तसेच संघटन मजबूत करण्याचा सल्ला दिला. 
 
या वेळी उपस्थित शेकडो तरुणांना मार्गदर्शन करताना नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष कोते पाटील यांनी हुंडा पद्धत त्यामुळे होणारी सामाजिक हानी याबाबत मार्गदर्शन करताना परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करण्याचे आवाहन तरुणांना केले. चांगल्या कामाला अगोदर लोक नाव ठेवतील. मात्र, पुढे हेच लोक तुमचं नाव काढतील. मी हुंडा घेणार नाही, असा शब्द कोते पाटील यांनी उपस्थित तरुणांकडून घेत आशावाद व्यक्त केला. 
 
या वेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत येत्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षासाठी नवसंजीवनी ठरणार असून पुढील मुख्यमंत्री अजित पवार होणार असल्याचे भाकीत कोते पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशांत कदम यांनी केले, आभार वाळूज महानगर अध्यक्ष उमेश दुधाट यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती होती. 

 
बातम्या आणखी आहेत...