आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाला मिळणार शासकीय दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसत असून पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत फळबागधारकांना तब्बल 150 कोटी रुपयांचे वाटप होण्याची शक्यता आहे. त्यातील 40 कोटी 72 लाख रुपये फळबागधारकांना देण्यात आले आहेत.

2011 च्या खरिपात जिल्ह्यातील बहुतांश भागात आणेवारी कमी आली होती. रब्बीतही तसेच चित्र होते. त्यानंतर 2012 मध्ये तर सर्वत्रच पैसेवारी खाली राहिली. रब्बीचा पत्ताच नव्हता. तेव्हाच एका शेतकर्‍याला कोरडवाहू जमिनीसाठी प्रतिहेक्टरी 3 हजार व बागायतदारांसाठी 5 हजार आणि फळबागांसाठी 8 हजार रुपये देण्याची घोषणा शासनाने केली होती. हा आकडा 1 अब्ज रुपयांच्या पुढे जाणार आहे. दुष्काळात फळबागा वाचवण्यासाठी शासनाने हेक्टरी 30 हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये देण्यात आले. पावसाळा सुरू झाल्यानंतर ज्यांच्या फळबागा वाचल्या त्यांना पुन्हा तेवढीच रक्कम देण्यात आली. एकूण 40 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले असून आता खरिपाच्या पेरण्या झाल्यानंतर शेतकर्‍यांना 110 कोटी रुपये मिळू शकतात. महसूल विभागाकडून तशी तयारी सुरू आहे. त्याचबरोबर ज्या शेतकर्‍यांच्या बागा पूर्ण जळाल्या त्यांना किती मदत द्यायची हे ठरलेले नाही. ते ठरल्यानंतर मदतीचा आकडा वाढू शकतो.

असे आहे जिल्ह्याचे चित्र
शेतकर्‍यांची संख्या- 4 लाख 72 हजार
फळबागधारक शेतकरी- 31 हजार
फळबागाबाधित झालेले शेतकरी- 24 हजार
फळबागधारकांना मिळालेली रक्कम- 40 कोटी 72 लाख
कोरडवाहू, बागायती शेतकर्‍यांसाठी अपेक्षित रक्कम- 110 कोटी

शेतकरी पाच वर्षांनी माघारला
सतत दोन वर्षे शेतीने शेतकर्‍यांना पावसाने हात दिल्याने शेतकरी किमान पाच वर्षे मागे गेला आहे. पेरणीसाठी शेतकर्‍यांनी उसनवारी केली असून शासनाकडून अनुदानाची ही रक्कम हाती पडल्यास उसनवारीची परतफेड करणे शक्य होईल. तसेच शेतीचा विकास करण्यासही हातभार लागेल.