आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला, खुलताबाद, कन्नडसह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद तालुक्यात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली.छाया : शेख जमीर - Divya Marathi
खुलताबाद तालुक्यात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली.छाया : शेख जमीर
औरंगाबाद- औरंगाबाद शहरासह जिल्हयातील खुलताबाद, कन्नड तालुक्यात पावसाने दुपारी दोन वाजेच्या सुमारास हजेरी लावल्याणे बळीराजा सुखावला आहे. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे कोमेजलेल्या पीकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दशकभरानंतर या वर्षी ७ जून रोजी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर एक महिना वरुणराजाची काही कृपा झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे ढग शेतकऱ्यांवर घोंगावत होते. मका, बाजरी, सोयाबीन, तूर, ज्वारी, कापूस, मूग, उडीद या मुख्य पिकांनी माना टाकल्या होत्या. बहुतेक ठिकाणी ४० ते ५० टक्के पेरणी वाया गेली. मात्र, आता पुन्हा सुरू झालेला पाऊस ज्यांनी अद्याप पेरणीच केली नव्हती, अशा कास्तकारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. काळे ढग बघून मनातील काळे िवचार गळून पडले असून त्यात आशेची हिरवळ तग धरायला लागली आहे. शहरांतही गेल्या महिन्यापासून लोक उकाड्यामुळे त्रस्त झाले होते. अचानक मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास आलेल्या पावसामुळे उकाडा पळाला असून आल्हाददायक वातावरणाचे आगमन झाले आहे.

पिकांना आधार मिळाला
गोळेगाव- मागील एक महिन्यापासून गायब असलेल्या पावसाने गोळेगाव परिसरात हजेरी लवल्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना पिकांना आधार मिळणार आहे. गोळेगाव परिसरात रिमझिम पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कन्नड तालुक्यातही सरी
कन्नड- गेल्या चाळीस दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी तालुक्यातील काही भागांत पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. सोमवारपासून वातावरणात बदल होऊन मंगळवारी तालुक्यातील टापरगाव, आढेगाव, खेडा, चापानेर, टाकळी, कळंकी, कोळवाडी परिसरात काही वेळ पावसाने हजेरी लावली होती.
खुलताबादेत जोरदार पाऊस
खुलताबाद-
तालुक्यात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खुलताबाद शहराच्या परिसरासह वेरूळ, पळसवाडी, निरगुडी, पिंपरी, नंद्राबाद, शूलिभंजन, बाजारसावंगी यासह विविध ठिकाणी मंगळवारी दुपारी जवळपास पाऊणतास मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. एक महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. परिणामी, कापूस, मका, सोयाबीन, अद्रक आदी पिके पाण्याअभावी करपून गेली होती.
बातम्या आणखी आहेत...