आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेमेंटअभावी ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - पैठण तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकरी साखर कारखान्याच्या उदासीन धोरणामुळे पैशांअभावी अडचणीत सापडले असून त्यामुळे शेतकर्‍ यांना विवाह समारंभ पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.
उसाचे उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर भागात शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन आठवडे साखर कारखाने बंद ठेवण्यात आले. परिणामी, ऊसतोड कामगार, ऊस वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, मराठवाड्यात या आंदोलनाचा काहीही परिणाम झाला नाही. पैठण तालुक्यातील संत एकनाथ, शरद कारखाने या वर्षी बंद राहिले. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकर्‍ यांना बाहेरील साखर कारखानदारांना ऊस देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर भागातील साखर कारखानदारांनी ऊसतोड कामगार वाहतूकदारांचे नुकसान टाळण्यासाठी पैठण तालुक्यात पाठवले. पैठण तालुक्यातील सुमारे चार लाख टन ऊस बाहेरील दहा साखर कारखानदारांनी गळितासाठी नेला. ऊसदर जाहीर नसताना या भागातील ऊस नेण्यासाठी दहा साखर कारखान्यांत स्पर्धा लागली, ऊसउत्पादक शेतकर्‍ यांनी दर जाहीर
नसतानाही ऊस दिला.
साधारण एका महिन्यात उसाचे बिल मिळणे अपेक्षित होते. मात्र, आता दोन महिने उलटले, तरी अद्याप उसाचे पेमेंट मिळाले नसल्याने शेतकरी अडचणी सापडले आहेत. सावकार व राष्टÑीयीकृत बँकांनी पैशांसाठी तगादा सुरू केला आहे. त्यामुळे शेतकर्‍ यांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झाली आहे.
ऊसउत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. कुठल्याही साखर कारखान्याने दर जाहीर केले नाही व उसाचा पहिला हप्ता देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकर्‍ यांचे वार्षिक नियोजन कोलमडले आहे. पैशांअभावी लग्नकार्यात अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कोणता कारखाना किती भाव देणार याकडे शेतकर्‍ यांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून कारखान्यांनी उसाच्या पहिल्या हप्त्याचे पेमेंट करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात उस नेला. मात्र, अद्याप पेमेंट मिळाले नाही व त्याविषयी कोणतेही कर्मचारी माहिती देत नसल्याने पैशांअभावी ऊसउत्पादक शेतकरी अडचणी सापडले आहेत.
संतोष नरके, शेतकरी