आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीवर ताबा करण्याचा प्रयत्न; 25 जणांवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - वडिलोपाजिर्त इनामी शेतीत काम करत असताना काजी मोहंमद फय्याजोद्दीन मोहंमद कुतुबोद्दीन (55) यांना लाठय़ा-काठय़ा व कुर्‍हाडीचा धाक दाखवून त्यांच्या शेतीचा बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने 25 जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी (20 डिसेंबर) गुन्हा नोंदवला आहे.

येथील नगर-औरंगाबाद महामार्गाला लागून वाळूज गावाजवळ गट क्रमांक 354 मध्ये काजी मोहंमद फय्याजोद्दीन मोहंमद कुतुबोद्दीन (55 रा. वाळूज) यांची जमीन आहे. ही इनामी जमीन असून पणजोबा, आजोबाकडून परंपरेने त्यांच्याकडे आली आहे. 9 नोव्हेंबर रोजी मोहंमद फय्याजोद्दीन शेतीत काम करत असताना सायंकाळी चारच्या सुमारास 20 ते 25 जण तीन ट्रॅक्टर, दोन दुचाकीद्वारे आले. त्यांनी लाठय़ा-काठय़ा व कुर्‍हाडी घेऊन त्यांच्या अंगावर धावून जाऊन ठार मारण्याची धमकी देत शेतीवर ताबा करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी काजी फय्याजोद्दीन यांनी गंगापूरच्या प्रथमवर्ग दंडाधिकार्‍यांच्या कोर्टात धाव घेतली. कोर्टाने वाळूज पोलिसांना संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. या आदेशावरून पोलिसांनी मुजीबखान उस्मानखान, सचिन अशोक साबळे, शेख निझाम शेख मीरा, पप्पू बारामतीवाला, शेख रौफ, शेख जाकीर शेख इस्माईल, शेख रियाज शेख नईम, रुख्साना शेख सलीम, शहानूरबी शेख नईम यांच्यासह 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष निकुंभ तपास करीत आहेत.