आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नासाठी पैसे नसल्याने शेतकर्‍याच्या एकोणीस वर्षीय मुलीने संपवली जीवनयात्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोड- शेतकरी वडिलांची आर्थिक परिस्थिती एकदम ढासळलेली मग लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव कसे करणार, त्यात बँकेचे अगोदरच देणे आहे. यंदा पिकांची अवस्था बिकट आहे. वडिलांना लग्नाचा ताण नको म्हणून एकोणीस वर्षीय राजश्री काकासाहेब सातपुते या तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केले. ही घटना पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे येथे सोमवारी घडली. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली.

 

दादेगाव हजारे येथील काकासाहेब सातपुते यांना दोन एकर शेती असून त्यांनी या जमिनीवर पाचोड येथील राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज काढलेले आहे. यावर्षी निसर्गाची साथ लाभल्यामुळे उशिरा पडलेल्या पावसामुळे खरिपातील कापसाचे अतोनात नुकसान झाले. यातच त्यांची मुलगी राजश्री हिचे लग्न जमले होते. वडिलांची दयनीय परिस्थिती मुलीला पाहावली न गेल्यामुळे तिने आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...