आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीच्या मोबदल्यासाठी रास्ता रोको: ३५० हेक्टर सरकारी जमीन आहे.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन - Divya Marathi
पैठण-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
बिडकीन - डीएमआयसी प्रकल्पासाठी बिडकीन, नांदलगाव, निलजगाव, बन्नीतांडा, बंगलातांडा येथील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला. मात्र, अधिग्रहित वर्ग २ च्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मोबदला त्वरित मिळावा, यासाठी संतापलेल्या शेतकऱ्यांनी पैठण-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
डीएमआयसीसाठी भूसंपादन केलेल्या जमिनीमध्ये ३५० हेक्टर सरकारी (वर्ग २) जमीन आहे. या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय अायुक्त यांच्या वेळोवेळी भेटी घेतल्या. मात्र, भूसंपादन होऊन दीड वर्ष उलटले, परंतु अद्यापही त्यावर काहीच कारवाई झाली नाही. तसेच शेतकऱ्यांना पैसेही मिळाले नाहीत. त्यामुळे वर्ग २ च्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आठ दिवसांत मोबदला द्यावा, अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अामरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी या वेळी प्रशासनास दिला.
बातम्या आणखी आहेत...