आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांचा जायकवाडी धरणावर ठिय्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - पिण्यासाठी राखीव ठेवलेले पाणी शेतीसाठी सर्रास वापरत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने प्रकाशात आणल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. पाणीचोरी करणा-या शेतक-यांविरोधात उघडलेल्या मोहिमेच्या दुस-या दिवशी वेगळेच वळण मिळाले. 500 शेतक-यांनी जायकवाडी धरणात उड्या मारण्याचा इशारा देताच प्रशासनाने थोडेसे नमते घेत दोन दिवसांची स्थगिती दिली आहे.

धरणाच्या डाव्या कालव्याजवळ या अनधिकृत विद्युत मोटारींचे जाळेच निर्माण झाले आहे. जायकवाडी परिसरातील शेतक-यांनी पाण्यावर दरोडा टाकला आहे. यासंदर्भात दै. ‘दिव्य मराठी’ने 5 रोजी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर प्रशासनाने अवैध मोटारींवर आठ तासांत कारवाई करत जवळपास 250 कृषी पंपांचा वीजपुरवठा तोडला. पाणी चोरणा-या शेतक-या ंविरोधात उघडलेल्या प्रशासनाच्या मोहिमेला दुस-या दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारीला विरोध झाला. तहसीलदार राजीव शिंदे व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी एस. एल. भार्गोदेव यांच्या संयुक्त पथकाने सकाळी 10 वाजता नाथसागरावर छापा टाकला. विद्युत मोटारी जप्त करण्यापूर्वीच सुमारे 500 ते 600 शेतक-या ंनी घोषणाबाजी करत धरणात उड्या टाकण्याचा पवित्रा घेतला. तहसीलदार शिंदे यांनी शेतक-या ंना जागेवर नोटिसा बजावल्या. मोटारी जप्तीच्या कारवाईस अडथळा आणल्यास अटक करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यानंतरही शेतक-या ंनी जलाशयाच्या काठावर सुमारे चार तास मोटारींचे संरक्षण करत ठिय्या आंदोलन केले. अखेर विभागीय आयुक्तांच्या सुचनेनुसार कारवाईला दोन दिवसांची स्थगिती मिळाली. 8 फेब्रुवारीपर्यंत मोटारी काढून घेण्याचा अल्टिमेटम प्रशासनाने शेतक-या ंना दिला आहे. या वेळी पाटबंधारे उपअभियंता एस. एस. भावठाणकर, महावितरणचे डी. आर. कुंडे, एस. एम. सूर्यवंशी, डी. एफ. नगराळे आदींची उपस्थिती होती.

बिअर कंपन्यांचा पाणीपुरवठा बंद करा
स्थानिक शेतक-यांनी मोटारी काढून घेण्याची तयारी दर्शवली. मात्र, यापैकी काही शेतकरी मोटारीजवळ जाऊन बसले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ‘बिअर कंपन्यांचा पाणीपुरवठा बंद करा’, ‘आमचे धरण आमचे पाणी’, ‘शेतीला पाणी मिळालेच पाहिजे’ या घोषणा शेतक-यांनी दिल्या.

प्रशासनाने सुवर्णमध्य काढावा
अधिका-यांनी शेतक-यांच्या नेमक्या समस्या समजून घेणे आवश्यक आहे. याबाबत आमदारांनी पुढाकार घ्यावा. एमआयडीसीतील प्रक्रिया उद्योगांना लागणारे लाखो लिटर पाणी तत्काळ बंद करावे. पाणी आहे म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतक-यांनी पैठणमध्ये राहणा-या शेतक-यांकडे गुरे आणून ठेवली आहेत. मोटारी बंद केल्यास जनावरांचे हाल होतील, याकडेही प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
जयाजी सूर्यवंशी, जायकवाडी धरणग्रस्त शेतकरी संघर्ष कृती समिती.