आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज, नापिकीमुळे तरुण शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर- गंगापूरजवळील जामगाव येथील सुनील श्रीहरी मगर (40) या शेतकर्‍याने नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे अशक्य झाल्यामुळे झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जामगाव येथील सुनील र्शीहरी मगर अल्पभूधारक शेतकरी होता. त्याची जामगाव शिवारात दीड एकर शेती असून या वर्षी शेतामध्ये त्याने कापसाचे पीक घेतले होते; परंतु पावसाअभावी सर्व पीक वाळून गेल्यामुळे हाती काहीही लागले नाही. त्याच्यावर बँकेचे कर्ज असून परिवारामध्ये 2 मुली, एक मुलगा व पत्नी अशी कौटुंबिक जबाबदारी असून दोनपैकी एक ा मुलीचे लग्न करण्यासाठी एक स्थळही त्याने पाहून ठेवले होते.

परंतु शेतीने दिलेला दगा, बँकेचे कर्ज, मुलीचे लग्न या सर्व संकटांमुळे शेतकरी काही दिवसांपूर्वी आजारी पडला होता. आजारपणावरही बराच खर्च झाल्यामुळे पुढे काय याची चिंता त्याला त्रस्त करत होती. या विवंचनेतच सुनीलने आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.