आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या, विजेच्या धकक्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड- बँकेकडून घेतलेले कर्जाच्या परतफेडीसाठीच्या तगाद्यामुळे कंटाळून शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पैठण तालुक्यातील आंतरवाली खांडी येथे शुक्रवारी घटना घडली. एकनाथ नारायण डिघुळे असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. आडूळ येथील बँकेकडून दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्याच्या चिंतेतून गुरुवारी रात्री गळफास घेऊन एकनाथ डिघुळे यांनी आत्महत्या केली. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली अाहे. पुढील तपास सपोनि महेश आंधळेे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार गोरखनाथ कणसे करत आहेत. 

विजेच्या धकक्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू 
बिडकीन विजेचाधक्का लागून बंडू भागचंद इथापे (२३, लोहगाव ता. पैठण) यांचा मृत्यू झाला. ते दुपारी मावसगव्हान शिवारातील आपल्या शेतात वीज मोटार चालू करताना शॉक लागल्याने त्यांचा मुत्यू झाला. बिडकीन ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्याला डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 
बातम्या आणखी आहेत...