Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Farmer Suicide In Aurangabad

अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 15:41 PM IST

  • अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
सोयगाव-अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा न झाल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गलवाडा(अ) ता. सोयगाव येथे शनिवारी (दि.१८) रात्रीच्या सुमारास घडली. दगडू तुकाराम पाटील (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा न करण्यात आल्याने केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. कर्जमाफीची घोषणा होणार की नाही या विवंचनेत अडकलेल्या दगडू तुकाराम पाटील (४८) या अल्पभूधारक शेतकऱ्याने घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत अल्पभूधारक शेतकऱ्याकडे दोन एकर जमीन आहे.

Next Article

Recommended