आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्येच्या फासाची होळी, निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळ व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली मदत अपुरी आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षातर्फे सोमवारी औरंगपुरा येथे शेतकरी आत्महत्येच्या प्रतीकात्मक फासाची होळी करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली.
सायंकाळी चार वाजता झालेल्या या आंदोलनात राज्य सदस्य व मराठवाडा संयोजक सुभाष लोमटे, हरदासजी, अण्णा खंदारे, जिल्हा समन्वयक मनीषा चौधरी, खुलताबादचे सय्यद कासमभाई, कन्नडचे कृष्णा जाधव तसेच संवाद यात्रेचे समन्वयक सुरेश पवार यांनी मार्गदर्शन केले.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी मदतीसाठी पात्रतेचे निकष किचकट आहेत. आत्महत्या केलेल्यांच्या नावावर कर्ज आणि त्याच व्यक्तीच्या नावावर शेतीच्या सातबाऱ्याच्या उताऱ्याची सक्ती, या दोन अटी बदलल्या पाहिजेत. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवेस अथवा मृताच्या आईस किमान वेतनाशी सुसंगत एवढा मासिक निर्वाह भत्ता कायमस्वरूपी दिला जावा. अवर्षणग्रस्त भागात प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये एका तरी व्यक्तीस शेतीबाह्य क्षेत्रात रोजगार देण्याची व्यवस्था झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या िनवेदनात करण्यात आली.

आंदोलनात दौलतराव मोहिते, सतीश संचेती, दत्तू पवार, शरीफ हुसेन, रघुनाथ पेटकर, बाळकृष्ण बनसोड, कारभारी औटे, कांती बाबूलाल शर्मा, रेखा महाजन, नलिनी चिनागी, मोहम्मद बशीर, दत्ता झरेकर, सर्जेराव जाधव, बळीराम गायकवाड, अरविंद बोरकर, फरदीन खान, सय्यद झुबेर, गौरव भार्गव आदींचा सहभाग होता.