आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद एमआयडीसीचे पाणी तोडले, दोनशेवर शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - शेती-सिंचनासाठी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी उग्रावतार धारण केला. पैठणमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सकाळी ८.३० ला औरंगाबाद एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद केला. दिवसभर पाणी बंद राहिल्यानंतर बिडकीन पोलिसांनी २०० वर आंदोलक शेतकऱ्यांना संध्याकाळी ताब्यात घेतले. दरम्यान, दीड हजारावर उद्योगांना या आंदोलनाचा फटका बसला.
औरंगाबाद एमआयडीसीचे पाणी बंद करा; अन्यथा शेतीला पाणी द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे १५ दिवसांपूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी शेतकऱ्यांनी औरंगाबादला पाणीपुरवठा होणाऱ्या ब्रम्हगव्हाण -लोहगाव येथे सकाळी ८.३० वाजता घोषणाबाजी केली. नंतर पंप हाऊसकडे मोर्चा वळवत तेथून पाणीपुरवठा बंद केला. सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. सायंकाळी सात वाजता बिडकीनला २०० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना बंद पाणीपुरवठा सुरू करू दिला नाही. त्यामुळे दोन तासांनी अधिकारी परत गेले.
बातम्या आणखी आहेत...