आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावकाराने हडपलेली जमीन परत द्या; शेतकऱ्यांचा टाहो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- सावकाराने हडप केलेली परतूर तालुक्यातील सातोना शिवारातील २३ एकर जमीन परत मिळावी या मागणीसाठी वृद्ध शेतकरी गोविंद भालेराव, मुलगा संदीप भालेराव, मुलगी वंदना भालेराव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान आमची जमीन मला परत द्या, असा टाहो फोडला. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे भाषण सुरू होते.

मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री लोणीकर जिल्हाधिकारी शिवाजी जोधळे यांनी भालेराव कुटुंबीयांना दालनात बोलावून घेत लवकरच जमीन परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शिवाय १९ ऑगस्ट रोजी जमिनीची कागदपत्रे सोबत मागवली आहेत. दरम्यान, जमीन मिळावी अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा या कुटुंबीयांनी यापूर्वीच दिला होता. मात्र, प्रशासनाने त्याकडे पुरेसे लक्ष दिल्यामुळे कुटुंबीयांनी थेट १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्र्याकडे दाद मागितली. सावकाराच्या जाचाला कंटाळलेल्या शेतकऱ्याची व्यथा पाहून उपस्थितांनी सहानुभूती व्यक्त केली. तसेच लवकर त्यांना जमीन मिळावी, अशी चर्चाही या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती.

भाषणा दरम्यान वेधले लक्ष
पालकमंत्रीबबनराव लोणीकर यांचे भाषण सुरू होते. दरम्यान परतूर तालुक्यातील सातोना येथील शेतकरी भालेराव कुटुंबाने सावकाराने हडपलेली आमची जमीन परत करा, अशी मागणी लावून धरल्याने उपस्थितांचे लक्ष या कुटुंबीयांकडे गेले. परंतु, कार्यक्रमामध्ये काही व्यत्यय येऊ नये, यासाठी पोलिसांनी त्यांना थोडेसे सावरले. मात्र दरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

सावकाराने हडपलेली जमीन परत द्या या मागणीसाठी भालेराव कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले.
बातम्या आणखी आहेत...