आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानग्रस्तांना सरसकट मदत, वीज बिले माफ करा; शेतक-यांनी काढली मंत्र्यांची प्रेतयात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर- गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून ऊर्जामंत्री व कृषिमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून महावितरण कार्यालयाकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना अडवून पोलिसांच्या गाड्यांमध्ये कोंबत असताना झालेल्या पोलिसांच्या धरपकडीमध्ये अनेक शेतकरी जखमी झाले.  


सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवाजी महाराज व डॅ. आंबेडकरांना अभिवादन करून आंदोलनाला सुुरुवात केली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या, सक्तीची वीज बिल वसुली बंद करून तोडलेले कनेक्शन्स त्वरित जोडा, सरसकट कर्जमाफी द्या या व इतर मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन सरकारविरोधी घोषणा देत शहर दणाणून सोडले .  


...शेतकऱ्यांच्या मागण्या  
कपाशीवरील बोंडअळीबाधित शेतकऱ्यांसाठी कापूस कायद्यातील कमुना जीआय या जाचक अटी-शर्ती त्वरित रद्द करून बोगस बीटी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करून सरसकट पंचनामे करून हेक्टरी १ लाखाची मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची कृषिपंपाची वीज खंडित न करता पूर्णपणे माफ करावी आदी मागण्या आहेत.

 

आता मुख्यमंत्री टार्गेट  
पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या वरील मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई व नागपूर येथील घरासमोर गनिमी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

आंदोलनाची पार्श्वभूमी  
गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली बोंडअळी, कृषिपंपांची सक्तीची वीज वसुली थांबवणे, कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी राज्यात सर्वप्रथम एक महिन्यापूर्वी वरील मागण्यांसंदर्भात आवाज उठवला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९ तहसीलदारांना वरील मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर औरंगाबाद येथील कृषी अधीक्षक कार्यालयात आत्मदहन आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या विदर्भातील खामगाव येथील घरावर जाऊन बोंडअळीची झाडे जाळून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आज गंगापूर येथे अभिनव पद्धतीने आंदोलन करून शासनाला शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, मंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा...

बातम्या आणखी आहेत...