आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकर्‍यांचा तहसीलदारांना घेराव; गारपीटग्रस्तांना मदत न मिळाल्याने संताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फेब्रुवारीत झालेल्या गारपिटीनंतर तालुका औरंगाबाद, पण पैठण विधानसभा मतदारसंघात असलेल्या 42 गावांत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, पात्र शेतकर्‍यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत आणि लाभार्थींना भरपाई मिळाली नाही, यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी गुरुवारी दुपारी तहसीलदार विजय राऊत यांना कार्यालयातच घेराव घातला. तहसील कार्यालयात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
या आंदोलनात जयाजी सूर्यवंशी, विलास चव्हाण, कल्याण देहाडे, भरत पवार, मनोहर झिंजुर्डे, गणपत झिंजूर्डे, सुनील पठाडे, कृष्णा पवार सहभागी झाले होते. लाभार्थी शेतकरी नेमके कोण, याची यादी जाहीर झाली असती, तर त्यावर हरकती, आक्षेप घेता आले असते. मात्र, प्रशासनाने यादी मुद्दाम दडवून ठेवली.

असा आहे आरोप
42 गावांतील पंचनामे योग्य प्रकारे करण्यात आले नाहीत. शिवाय 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानधारकांची यादी प्रत्येक गावात डकवली जाईल, असे सांगण्यात आले होते. तसेही झाले नाही. आता पेरणीची वेळ आली, तरी नुकसान भरपाई देण्यात आली नाही. याच मागणीसाठी आंदोलकांनी 14 मे रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते, तरीही पैसे वाटप झाले नाही.

तहसीलदार काय म्हणतात?
येथील पंचनामे झाले आहेत. पात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी सकाळी प्रत्येक गावात डकवण्यात येईल आणि पुढील आठवड्यात पैशांचे वाटप सुरू होऊ शकेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
(फोटो - गारपीटग्रस्तांना भरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी तहसीलदार विजय राऊत यांना कार्यालयात घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. छाया : माजेद खान)