आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागडेंच्या कारखान्यात शेतक-यांची फसवणूक : अा. हर्षवर्धन जाधव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे अध्यक्ष असलेल्या छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. राज्यभरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने मी याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. परंतु बागडे त्यावर चर्चा होऊ देणार नाहीत, कारण ते शेतकऱ्यांचे हित बघत नाहीत. त्यांनी ही लक्षवेधी लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढावा, असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले. एफआरपी म्हणजे २५५० रुपये थेट शेतकऱ्यांच्या हाती पडले पाहिजेत, तोडणी वाहतुकीचा खर्च त्यातून कपात करू नये, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजीराजे कारखान्याने त्यांचा दर जाहीर केला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार तेथे तोडणी वाहतुकीची कपात होत नसल्याचे जाधव म्हणाले. हा केवळ बागडे किंवा औरंगाबाद जिल्ह्याचा प्रश्न नाही तर राज्यभरातील कारखानदार शेतकऱ्यांना लुटत आहेत. आपल्या जिल्ह्यात तरी वाहतूक तोडणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत, अन्यत्र तर मनमानी सुरू असल्याचे ते म्हणाले.

 

हमीभावातून तोडणी, वाहतुकीचा खर्च कपात कसा? : राज्य शासनाने उसाला प्रतिटन २५५० रुपये हमीभाव जाहीर केला. प्रत्यक्षात याच हमीभावातून औरंगाबाद जिल्ह्यात ४३४ रुपये तोडणी वाहतूक खर्च कपात केला जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या हाती २११६ रुपये पडतात. तेव्हा शासनाचा हमीभाव कोठे आहे, असा सवाल त्यांनी केला. तोडणी वाहतूक खर्च किती वसूल करायचा हे ठरवण्याचे अधिकार शासनाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु औरंगाबाद वगळता कोठेही दर निश्चित नाही. त्यामुळे कारखानदारांची मनमानी सुरू आहे.

 

उतारा ठरवण्याचे अधिकारही कारखान्यालाच : १० पेक्षा जास्त उतारा आला तर उसाला जास्तीचा भाव मिळतो. परंतु उतारा निश्चित होत असताना तेथे कारखान्याचेच अधिकारी असतात. त्यामुळे दर कमी देता यावा यासाठी ठरवून उतारा कमी दाखवतात, असा आरोप त्यांनी केला. कन्नड सहकारी साखर कारखाना सुरू असताना सलग दहा वर्षे तेथील उतारा साडेबाराच्या पुढे होता. तेव्हा नवे वाणही बाजारात आले नव्हते. आता नवे वाण बाजारात आले असतानाही उसाचा उतारा १२ पर्यंत का जात नाही, असा सवाल त्यांनी केला.


एफआरपीपेक्षाही जास्त भाव देतो
माझ्या कारखान्यात मी एफआरपीपेक्षा जास्त भाव देतो. जाधव यांनी तीन वर्षांचे रेकॉर्ड तपासून पाहावे. राहिला विषय लक्षवेधीचा तर ती अद्याप माझ्यासमोर आलेली नाही. -हरिभाऊबागडे, विधानसभा तथा संभाजीराजे कारखान्याचे अध्यक्ष.

बातम्या आणखी आहेत...