आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांच्या मुलींचे कन्यादान करणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद येथे शेतकरी कुटुंबांना मदत करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. छाया : दिव्य मराठी - Divya Marathi
खुलताबाद येथे शेतकरी कुटुंबांना मदत करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. छाया : दिव्य मराठी
औरंगाबाद- गेल्या चार वर्षांच्या दुष्काळामुळे पिकांबरोबरच आयुष्यही करपत चाललेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सोबतीला शिवसेना धावून आली आहे. शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी पक्षाने ‘शिवसेनाप्रमुख कन्यादान योजना’ हाती घेतली असून यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे घेऊन शेतकऱ्यांच्या विवाहोत्सुक मुला-मुलींची लग्ने लावून दिली जाणार आहेत. खिशात पैसे नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी लोकसहभाग म्हणजेच शेतकऱ्यांनी भरावयाच्या रकमाही शिवसेनाच भरणार आहे.
खुलताबाद फुलंब्री येथे औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत केल्यानंतर शेतकऱ्यांशी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. त्यामुळे मराठवाड्यातील एकाही शेतकऱ्याने आता मुलींच्या लग्नाची चिंता करू नये, असे आश्वासक आवाहन त्यांनी केले. शिवसेनाप्रमुखांच्या नावे असलेल्या या योजनेत लग्नाचा सर्व खर्च केला जाणार असून कन्यादान म्हणून गृहोपयोगी वस्तूही दिल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांकडून नोंदणी झाल्यानंतर त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातील.

योजनांतील ६२ लाखांचा वाटाही शिवसेना देणार
शेतकऱ्यांसाठीशासनाच्या विविध २७ प्रकारच्या योजना आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात शेतकऱ्याला आधी स्वत:चा वाटा टाकावा लागतो. मात्र, सद्य:स्थितीत शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे या योजनांचा लाभही ते घेऊ शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा लोकसहभागाचा वाटा शिवसेना भरणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. औरंगाबाद जिल्ह्याला अशा योजनांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी आहे. त्यात शेतकऱ्यांच्या वाट्याची ६२ लाख रक्कम शिवसेना भरणार आहे.

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आता कोणीही आत्महत्येचा विचार करू नये, अशी शपथ या वेळी उद्धव यांनी शेतकऱ्यांना दिली. यापलीकडे जाऊन काही अडचण आलीच तर आमचे तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.